iPhone 14 Launch Date: iPhone14 लॉन्चचा मुहूर्त ठरला, पुढील काही दिवसात आयफोन 14 बाजारात खरेदीसाठी उपलब्ध

बरेचं दिवसांपासून iPhone14 लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च होणार अशी चर्चा होती. पण या चर्चेवर आता शिक्कामोर्तब करण्यात आला असुन ७ सप्टेंबरला iPhone14 लॉन्च करण्यात येणार आहे.

iphone (Photo Credits: File Photo)

सध्या iPhone13 Series आंतराष्ट्रीय बाजारात (International Market) खरेदीसाठी उपलब्ध आहे. यात सध्या iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro, आणि iPhone 13 Pro Max अशी चार फोन्स उपलब्ध आहे. पण iPhone वापरकर्त्यांना तसेच iPhone नव्या घेण्याऱ्यांना प्रतिक्षा होती ती iPhone14 च्या नव्या सिरिजची (Series). बरेचं दिवसांपासून iPhone14 लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च (Launch) होणार अशी चर्चा होती. पण या चर्चेवर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. अॅपल (Apple) कडून त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन (Twitter)संबंधित घोषणा करण्यात आली आहे. तरी आयफोन युजर्समध्ये (iPhone User) संबंधित लॉंन्चबाबत मोठी उत्सुक्ता दिसून येत आहे.

कंपनीनं iPhone14 च्या लॉन्चिंग इव्हेंटसाठी (Launching Event) आमंत्रणंही पाठवण्यास सुरुवात केली आहे. आयफोन 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Mini अशी Apple ची नवी सिरिज या इव्हेंटमध्ये लॉन्च केली जाणार असल्याची चर्चा आहे. Apple चा ग्रान्ड इव्हेंट कॅलिफोर्नियाच्या (California) क्युपरटिनो शहरातील Apple Park मध्ये आयोजित करण्यात आला आहे. 7 सप्टेंबर (September) रोजी हा इव्हेंट (Event) पार पडणार आहे.  या इव्हेंटमध्येचं Apple ची आगामी आयफोन 14 सिरिज लॉन्च (series launch) करण्यात येणार आहे. तसेच, कंपनी नवीन Apple Watch ची घोषणा करणार असल्याची चर्चा आहे.  नवीन आयफोन 14  ची किंमत आधीच्या मॉडेलच्या (Model) तुलनेत 10,000 रुपयांपर्यंत जास्त असू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हे ही वाचा:-Online Shopping: ऑनलाईन ऑफरमध्ये शॉपिंग केल्यास फायदा की तोटा? जाणून घ्या महत्वाच्या टीप्स)

 

आयफोन 14  च्या लूक (Look) आणि स्पेसिफिकेशन (specification) बाबतीत सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) मोठी चर्चा आहे. आयफोन 14  हा आयफोन १३ च्या तुलनेत अधिक स्टायलिश (stylish) लूकमध्ये उपलब्ध असल्याचं बोल्ल्या जात आहे. तसेच कॅमरा (Camera), डिस्प्ले (Display) आणि नवीनही काही अपग्रेडेड (Upgraded) फीचर्स (Features) अॅड करण्यात आले आहे अशी चर्चा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now