Google Chrome New Update: गुगल क्रोम मध्ये आले नवे 'पासवर्ड प्रोटेक्शन फिचर', कसे कराल अपडेट?
आपल्या यूजर्सच्या खाजगी डिटेल्स संबंधित कुठलीही छेडछाड होऊ नये यासाठी गुगलने हे पाऊल उचलले आहे. यासाठी गुगल क्रोमने आपले लेटेस्ट व्हर्जन v88 रोल आऊट केला आहे.
सध्याच्या वेगवान टेक्नोलॉजीसह सायबर क्राईमचा धोका देखील वाढत चालला आहे. अशामध्ये आपल्या ईमेल आयडी, सोशल मिडियाशी संबंधित सर्व अकाउंट्सला प्रायव्हसी असणे गरजेचे आहे. हाच धोका लक्षात घेता गुगलने आपले क्रोम ब्राउजरमध्येही नवे अपडेट आणले आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये (Google Chrome) पासवर्ड प्रोटेक्शन (Password Protection) जोडता येणार आहे. आपल्या यूजर्सच्या खाजगी डिटेल्स संबंधित कुठलीही छेडछाड होऊ नये यासाठी गुगलने हे पाऊल उचलले आहे. यासाठी गुगल क्रोमने आपले लेटेस्ट व्हर्जन v88 रोल आऊट केला आहे.
यामुळे तुमचा गुगल क्रोमचा पासवर्ड जर कमकुवत असेल तर या अपडेशनमुळे तुम्हाला तो बदलण्याचा पर्याय मिळेल. यासाठी तुम्हाला ब्राउजरच्या अॅड्रेस बार मध्ये जाऊन chrome://settings/passwords टाईप करावे लागेल. ज्यामुळे तुमचे आधीचे सर्व पासवर्ड एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये दिसतील. जसे तुम्ही 'Check Now' वर क्लिक कराल तसे तुम्हाला तुमचा पासवर्ड कमकुवत आहे की नाही याची माहिती मिळेल. या पद्धतीने तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकाल.हेदेखील वाचा- WhatsApp New Privacy Policy: व्हॉट्सॲपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी बद्दल सरकारकडून विचार केला जात असल्याची रवि शंकर प्रसाद यांची माहिती
Google Chrome कसे कराल अपडेट?
- डेस्कटॉप यूजर्सला आपल्या क्रोम ब्राउजरला अगदी सोप्या स्टेप्सनुसार अपडेट करावे लागेल. यासाठी सर्वात आधी Google Chrome रन होईल. ब्राउजर ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला अॅड्रेस बार जवळ तीन डॉट्स दिसतील त्यावर टॅप करा.
- त्यानंतर खालच्या दिशेला स्क्रोल करुन सेटिंग्स (Settings) पर्यायावर क्लिक करा
- सेटिंग्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला अनेक पर्याय दिसतील.
- यात तुम्हाला Safety Check वर क्लिक करावे लागेल.
- जसे तुम्ही Safety Check वर क्लिक करता, तसे वरच्या बाजूस तुम्हाला Check Now चे निळे बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करुन तुम्हाला Google Chrome चे लेटेस्ट अपडेट चेक करायला मिळेल. जर तुमचे ब्राउजर लेटेस्ट अपडेटसह आधीच अपडेट असेल तर तुम्हाला ते अपडेशन साठी सांगणार नाही.
- मात्र जर ते अपडेट नसेल तर तुम्हाला त्यावर टॅप करुन लेटेस्ट अपडेट डाऊनलोड करावे लागेल. या पद्धतीने Google Chrome चे नवे v88 व्हर्जन सह तुम्हाला सिक्युरिटी पर्याय मिळेल.
अशा पद्धतीने तुम्ही गुगल क्रोमचे प्रायव्हसी प्रोटेक्शन तुम्ही अपडेट करु शकता. ज्यामुळे तुमचे खाजगी गोष्टी देखील सुरक्षित राहील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)