Honor 9A Smartphone आणि Honor MagicBook 14 लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असून 33 तासांची 4G कॉल्स, 35 तासांचे व्हिडिओ प्ले आणि 37 तासांचा FM रेडिओ प्ले मोबाईल एकदा चार्ज करुन वापरु शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
हॉनर कंपनीने आपला नवाकोरा HONOR 9A हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असून 33 तासांचे 4G कॉल्स, 35 तासांचे व्हिडिओ प्ले आणि 37 तासांचा FM रेडिओ प्ले मोबाईल एकदा चार्ज करुन वापरु शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. HONOR 9A चा 3GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी असलेला वेरिएंट हा 149.9 युरोजला उपलब्ध आहे. भारतातील याची किंमत आणि उपलब्धता याची माहिती लवकरच देण्यात येईल.
हॉनर कंपनीने या स्मार्टफोनचे अपग्रेडेड व्हर्जन HONOR MagicBook 14 या नावाने लॉन्च करण्याचे जाहीर केले आहे. या अपग्रेडेड व्हर्जनमध्ये 8 जीबी रॅम, 256 जीबी इंटरनल मेमेरी आणि 12 महिन्यांपर्यंत मायक्रोस्पॉट 365 चे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. HONOR MagicBook 14 हा सर्वात आधी युके, फ्रान्स आणि जर्मनी या देशांमध्ये 649.9 युरोजला उपलब्ध असून फक्त प्री ऑर्डर करण्यांना उपलब्ध होणार आहे.
HONOR Tweet:
या मोबाईल व्हेरिएंटचे वजन फक्त 185 ग्रॅम असून याची स्लिम बॉडी 9.04mm ची आहे. HONOR 9A मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून हे कॅमेरे 13MP+5MP+2MP असे आहेत. तर फ्रंट कॅमेरा MP चा दिला आहे. या मोबाईलमध्ये अॅनरॉईडचे 10 वे व्हर्जन असून Huawei ची नवी अॅप गॅलरी आहे. हॉनरने या सोबतच अजून काही नवीन गॅजेट्स लॉन्च करणार असल्याचेही सांगितले आहे. ऑनर मॅजिक वॉज 2 हे अपग्रेडेड मॉडल त्यांच्या वेबसाईटवर पाहायला मिळत आहे.