New Malware On Telegram: हॅकर्स टेलीग्रामवर विकत आहेत नवीन मालवेअर, जे चोरतात पीडिताच्या मशीनमधून संवेदनशील माहिती
Atomic macOS Stealer म्हणजेच एएमओएस (AMOS) प्लॅटफॉर्मला लक्ष्य करण्यासाठी टेलिग्राम चॅनेलवर Atomic macOS Stealer (AMOS) नावाचे नवीन मालवेअर विकले जात आहे. जे वापकर्त्यांची ऑटोफिल माहिती, पासवर्ड, वॉलेट आणि इतर बरीच सामग्री चोरण्याची अत्याधुनीक क्षमता ठेवतात.
Atomic macOS Stealer म्हणजेच एएमओएस (AMOS) प्लॅटफॉर्मला लक्ष्य करण्यासाठी टेलिग्राम चॅनेलवर Atomic macOS Stealer (AMOS) नावाचे नवीन मालवेअर विकले जात आहे. जे वापकर्त्यांची ऑटोफिल माहिती, पासवर्ड, वॉलेट आणि इतर बरीच सामग्री चोरण्याची अत्याधुनीक क्षमता ठेवतात. अशा मालवेअरची विक्री आणि जाहीरात करणारे एक टेलिग्राम चॅनल लोकांना असेच आढळून आले आहे. अशा प्रकारची मालवेअर्स डिवाईस युजर्ससाठी नेहमीच डोकेदुखी ठरत आली आहेत. तर डिवाईस निर्माता कंपन्यांसाठी अशा मालवेरपासून आपल्या उद्पादनाची आणि ग्राहकांचा बचाव करण्याचे आव्हान राहिले आहे. त्यामुळे विविध कंपन्या आपल्या उत्पादनाला डिवाईसपासून सुरक्षीत ठेवण्यासाठी नेहमीच नवनवी सॉफ्टवेअर्स आणि उत्पादनाचे अद्ययावतीकरण करतात.
वृत्तसंस्था आयएनएसने सायबल रिसर्च अँड इंटेलिजेंस लॅब्स (CRIL) चा हवाला देत म्हटले आहे की, Atomic macOS Stealer मालवेअर विशेषतः macOS ला लक्ष्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि पीडिताच्या मशीनमधून संवेदनशील माहिती चोरू शकते. वृत्तात असेही म्हटले आहे की, हॅकर या मालवेअरमध्ये सतत सुधारणा करत आहेत. तसेच, पीडिताचा डेटा आणि इतर सामग्री अधिक प्रभावीपणे चोरता यावी यासाठी ते हे मालवेअर अधिक कार्यक्षम बनवत आहेत. (हेही वाचा, Reliance Digital Store Fined: वापरलेले फोन विकल्याबद्दल रिलायन्स डिजिटल स्टोअरला दंड)
ट्विट
संशोधकांना टेलिग्राम चॅनलवर आढळून आलेल्या माहितीनुसार या मालवेअरचे सर्वात शेवटचे अपडेट 25 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. वृत्तानुसार, Atomic macOS Stealer पीडित व्यक्तीच्या डिवाईसमधून विविध प्रकारची माहिती चोरू शकतो. ज्यामध्ये कीचेन पासवर्ड, संपूर्ण सिस्टम माहिती, डेस्कटॉप आणि डॉक्युमेंट फोल्डरमधील फाइल्स आणि अगदी macOS पासवर्डचा समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)