Google Chrome Alert: हॅकर्सकडून गुगल क्रोम वापरकर्त्यांना धोका, सरकारकडून सावधगिरीचा इशारा; 'या' स्टेप वापरुन वाढवा सुरक्षा
Google Chrome ब्राउझरच्या वापरकर्त्यांसाठी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ( CERT-in ) कडून एक चेतावणी जारी केली आहे.
Google Chrome Alert : भारत सरकारने Google Chrome ब्राउझरच्या वापरकर्त्यांसाठी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ( CERT-in ) कडून एक चेतावणी जारी केली आहे. Google Chrome मध्ये अनेक त्रुटी आढळून आले आहे. Google Chrome मध्ये सिक्योरिटी जारी केली आहे. त्याचा वापर करून तुमची पर्सनल माहिती चोरीला जाऊ शकते. सरकारच्या सायबर सुरक्षा वॉचडॉगने अनेक असुरक्षा शोधून काढल्या आहेत आणि त्यांना उच्च तीव्रता म्हणून वर्गीकृत केले आहे. CERT-in च्या म्हणण्यानुसार, संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी आणि लक्ष्यित प्रणालीवर अनियंत्रित कोड कार्यान्वित करण्यासाठी हॅकर्सद्वारे या बहुविध असुरक्षा वापरल्या जाऊ शकतात.( हेही वाचा- Google Chrome चा वापर करत आहात?)
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Meity) अंतर्गत येणाऱ्या सायबर सुरक्षा एजन्सीने सांगितले की, Mac आणि Linux साठी 122.0.6261.57 पूर्वीच्या Google Chrome आवृत्त्यांमध्ये आणि Windows साठी 122.0.6261.57/58 पूर्वीच्या Google Chrome आवृत्त्यांमध्ये भेद्यता आहे.
वापरकर्त्याने काय करावे
वापरकर्त्यांने गुगल सिक्युरिटी अपडेट करणे गरजेचे आहे. सोबत Google Chrome देखील अपडेट करावे. वापरकर्त्यांने कोणतेही थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करू नये.एखादी अनोळखी वेब साईट असेल तर त्यावेळी साधवगिरि राखा. ईमेल किंवा मेसेजना उत्तर देणे टाळा
Google Chrome कसे अपडेट करावे
- तुमच्या डेस्कटॉपवर Google Chrome उघडा
- वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
- ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यासाठी उभ्या बिंदूंवर क्लिक करा, नंतर 'मदत' निवडा.
- 'Google Chrome बद्दल' निवडा.
- Google Chrome स्वयंचलितपणे अद्यतनांसाठी तपासेल आणि स्थापना प्रक्रिया सुरू करेल.
- अपडेट पूर्ण झाल्यावर, 'रीलाँच' बटणावर क्लिक करा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)