गूगल असिस्टंटच्या मदतीने करता येणार WhatsApp Video आणि Audio कॉल

आतापर्यंत युजर्सना केवळ गूगल असिस्टंट व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवण्याची सुविधा देत होता मात्र आता यामध्ये एक नवं फीचर जोडल्याने मेसेज प्रमाणेच ग्राहक ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकणार आहेत.

WhatsApp Image (Photo Credits: PixaBay)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे मेसेजिंग अ‍ॅप आबालवृद्धांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. ग्राहकांची युजर संख्या वाढवण्यासाठी यामध्ये सातत्याने प्रयत्न केले आहे. आता गूगलच्या नव्या अपडेटमुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणार्‍यांना नवं फिचर मिळणार आहे. नुकत्याच गूगलने दिलेल्या ब्लॉग पोस्ट नुसार, आता गूगल असिस्टंटच्या (Google Assistant) मदतीने युजर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज प्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करू शकणार आहे. आतापर्यंत युजर्सना केवळ गूगल असिस्टंट व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवण्याची सुविधा देत होता मात्र आता यामध्ये एक नवं फीचर जोडल्याने मेसेज प्रमाणेच ग्राहक ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकणार आहेत.

कसं असेल गूगलचं नवं फीचर?

गूगल असिस्टंटच्या मदतीने ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करायचा असल्यास त्याला कमांड द्यावी लागणार आहे. सामान्यपणे Hey Google... नंतर तुम्हांला हवी असलेली कमांड दिली की ते कार्यान्वित होते. त्यामुळे कॉल करण्यासाठी देखील