Gerald Jerry Lawson’s 82nd birthday Google Doodle: गूगल डूडल साजरा करतंय व्हिडिओ गेमचे प्रणेते गेराल्ड जे लॉसन यांचा 82 वा वाढदिवस, घ्या जाणून

गूगल डूडल (Google Doodle) आज साजरा करतंय त्यांचा 82 वा वाढदिवस. आजचे गूगल डूडल गेराल्ड जे लॉसन (Gerald Jerry Google Doodle) यांनाच अर्पण केले आहे.

Gerald Jerry Lawson- Doodle | (Photo Credits: Google)

गेराल्ड जे लॉसन (Gerald Jerry Lawson), व्हिडिओ गेमचे प्रणेते. गूगल डूडल (Google Doodle) आज साजरा करतंय त्यांचा 82 वा वाढदिवस. गेराल्ड जे लॉसन (Gerald Jerry Lawson’s 82nd birthday) हे असे एक व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी पहिली होम व्हिडिओ गेमिंग प्रणाली विकसित करणाऱ्या टीमचे नेतृत्व केले. आजचे गूगल डूडल गेराल्ड जे लॉसन (Gerald Jerry Google Doodle) यांनाच अर्पण केले आहे. आजच्या गूगल डूडलचे डिजाईन डेव्हियन गुडेन (Davionne Gooden), लॉरेन ब्राउन (Lauren Brown) आणि मोमो पिक्सेल (Momo Pixel) यांनी डिझाइन केले आहे.

गेराल्ड जे लॉसन यांचा जन्म न्यू यॉर्कमधील ब्रुकलीन येथे 1 डिसेंबर 1940 मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना इलेक्ट्रिक उपकरणांबाबत विशेष रुची होती. त्यामुळेच ते इलेक्ट्रिक वस्तू पाहिली की त्यासोबत अनेक उठाठेवी करत. जसे की ती वस्तू खोलने, त्याचे कार्य तपासणे, त्या पुन्हा जोडणे आदी. विशेष म्हणजे लहानपणीच ते आपल्या शेजाऱ्यांचे रेडीओ, टीव्ही दुरुस्ती करणे. त्यातील बिघाड दूर करणे असे उद्योगकरायचे. उल्लेखनीय बाब म्हणजे बिघडलेल्या वस्तू जमा करुन त्यांनी लहानपणी आपले स्वत:चेच एक रेडिओ स्टेशन सुरु केले. (हेही वाचा, Marie Tharp Google Doodle: मेरी थार्प यांच्या स्मरणार्थ गूगलच्या होमपेजवर झळकलं अ‍ॅनिमेटेड गूगल डूडल)

कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे करिअर सुरू करण्यासाठी लवकर निघण्यापूर्वी त्याने क्वीन्स कॉलेज आणि सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतले. त्या वेळी, परिसरात सुरू झालेल्या नवीन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कंपन्यांच्या स्फोटामुळे शहर आणि त्याच्या आसपासचा प्रदेश "सिलिकॉन व्हॅली" म्हणून ओळखला जाऊ लागला.

गेराल्ड जे लॉसन हे पुढे कॅलिफोर्नियाला आले. तेथे ते फेअरचाइल्ड सेमीकंडक्टरमध्ये अभियांत्रिकी सल्लागार म्हणून रुजू झाले. काही वर्षांनंतर, त्यांना फेअरचाइल्डच्या व्हिडिओ गेम विभागाचे अभियांत्रिकी आणि विपणन संचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली. जिथे त्यांनी फेअरचाइल्ड चॅनल एफ सिस्टम विकसतीत करण्यासाठी नेतृत्व केले. हे पहिले होम व्हिडिओ गेम सिस्टम कन्सोल होते ज्यामध्ये अदलाबदल करण्यायोग्य गेम डिजिटल जॉयस्टिक आणि पॉज मेनू होता. ज्यामुळे चॅनल एफ ने अटारी, एसएनईएस, ड्रीमकास्ट आणि बरेच काही यासारख्या भविष्यातील गेमिंग सिस्टमसाठी मार्ग मोकळा केला.

दरम्यान, गेराल्ड जे लॉसन यांनी 1980 मध्ये फेअरचाइल्ड सोडले आणि स्वतःची कंपनी, VideoSoft सुरू केली. कंपनीने अटारी 2600 साठी सॉफ्टवेअर तयार केले. पुढे याच क्षेत्रात ते नामांकीत उद्योजक, संशोधक बनले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif