Facebook Desktop App साठी सुरु केले नवे Dark Mode फिचर; 'या' सोप्प्या स्टेप्स वापरून तुमच्या डेस्कटॉप वर करा सुरु

सोशल मीडियावरील टॉप कंपनी फेसबुक (Facebook) ने आपल्या डेस्कटॉप अ‍ॅपवर (FB Desktop App) डार्क मोड (Dark Mode) हे नवीन फिचर सुरु केले आहे.

Facebook App Dark Mode (Photo Credits: Facebook)

सोशल मीडियावरील टॉप कंपनी फेसबुक (Facebook)  ने आपल्या डेस्कटॉप अ‍ॅपवर (FB Desktop App) डार्क मोड (Dark Mode)  हे नवीन फिचर सुरु केले आहे. मागील कित्येक वर्षांपासून या डार्क मोड ची युजर्सकडून मागणी केली जात होती. या मागणीचा विचार करून आता हे फिचर अधिकृतपणे लागू करण्यात आले आहे. आपल्या अपडेटेड फेसबुक डेस्कटॉप ऍपवर हे नवीन डार्क मोड सुरु करता येणार आहे. यानुसार फेसबुक वापरताना कमी उजेड असल्यास डार्क मोड सुरु करून स्क्रिनच्या लाईटवर नियंत्रण ठेवता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅपवर आणि इंस्टाग्राम वर फोनमध्ये हा डार्क मोड देण्यात आला होता, त्यांनतर आता डेस्कटॉपवर सुद्धा हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे फिचर तुमच्या डेस्कटॉप मध्ये लागू करण्यासाठी तीन सोप्प्या स्टेप वापरायच्या आहेत, या स्टेप्स कोणत्या आणि त्यानुसार सुरु केलेले डार्क मोड तुमच्या डेस्कटॉप वर कसे दिसेल हे जाणून घ्या. Whatsapp Dark mode Feature: Android, iOS युजर्ससाठी व्हॉट्सऍपचे नवे डार्क मोड फिचर लॉन्च; जाणून घ्या अपडेट करण्याची पद्धत

फेसबुकचे हे डार्क मोड डेस्कटॉप वर सुरु करण्यासाठी फॉलो करा या तीन स्टेप्स

1. प्रथम, मेन पेज वरील उजव्या कोपर्‍यातील अ‍ॅरोवर क्लिक करा.

२ 'डार्क मोड' पर्याय निवडा.

3. नवीन डार्क मोड आपल्या डेस्कटॉप अॅपवरील प्रोफाइलवर लागू होईल.

डार्क मोड सहित कसे दिसेल फेसबुक डेस्कटॉप

दरम्यान, नवीन फेसबुकची घोषणा ही गेल्या वर्षी F8 विकसक परिषदेत झाली होती. या नव्या फिचरच्या सोबतच आता नवीन डेस्कटॉप वेबसाइट अधिक सुव्यवस्थित नेव्हिगेशनसह वेगवान होणार आहे, याचा उपयोग अगदी मोबाइलप्रमाणेच व्हिडिओ, गेम खेळणे यासाठी केला जाऊ शकतो. फेसबुकने एका निवेदनात म्हटले आहे की, "डार्क मोडसह नवीन विसर्जन करणारा लेआउट वॉचवरील व्हिडिओ पाहणे उत्कृष्ट अनुभव बनवणारे ठरणार आहे."