Alert! गूगल प्ले स्टोअरवरील 'या' अ‍ॅपमुळे 10 करोड अ‍ॅन्ड्रॉईड युजर्सवर Data Theft चं सावट

ES File Explorer या लोकप्रिय अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती लिक होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Image used for representational purpose | (Photo Credit: Facebook)

स्मार्टफोनमध्ये अद्यावत तंत्रज्ञानामुळे जशी नवी फीचर्स मिळतात तसेच काही सुरक्षेच्या दृष्टीने काही धोकेदेखील आहेत. सध्या गूगल स्टोअरमधील (Google Play Store) एक लोकप्रिय अ‍ॅप तुमची वैयक्तित माहिती तुमच्या नकळत पहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ES File Explorer या लोकप्रिय अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती लिक होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आधार सिक्युरिटीच्या कमतरतेमुळे फ्रेंच सिक्युरिटी रिसर्चर Robert Baptiste ने दिलेल्या माहितीनुसार, ES File Explorer हॅक करणं अगदीच शक्य असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये छुप्या स्वरूपामध्ये वेब सर्व्हर आहे. स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंडमध्ये ते सुरू राहते. त्याला हॅक केल्यानंतर स्मार्टफोन युजर्सची सारी माहिती मिळू शकते. हॅकर तुमचा फोन नंबर, इमेजेस, व्हिडिओ, अ‍ॅप्स आणि इतर अ‍ॅन्ड्रॉईड डेटा सहज मिळवू शकतो.

अ‍ॅप तेव्हाच हॅक होऊ शकतं जेव्हा स्मार्टफोनमध्ये ES File Explorer कोणत्या लोकल नेटवर्कसोबत जोडलेले असेल. म्हणजे म्हणजे वायफायसोबत स्मार्टफोन कनेक्टेड असेल तर तो सहज हॅक होऊ शकतो. अद्याप ES File Explorer कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्ले स्टोअरच्या माध्यमातून 500 मिलियनहून अधिक वेळेस हे अ‍ॅप डाऊन

लोड झाले आहे.