Elon Musk Net Worth: इलॉन मस्कने तीन महिन्यात गमावले 40 बिलीयन डॉलर्स, वाचा नेमकं कारण
मस्क यांची नेटवर्थ कमी होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांमध्ये डेलावेअर कोर्टाने 55 अब्ज डॉलर्सचे नुकसान भरपाई पॅकेज नाकाणे आणि सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म एक्स संबंधी काही अडचणी यांचा समावेश आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मस्क यांच्या संपत्तीत लक्षणीय घट (Elon Musk Net Worth) झाली आहे. 2024 च्या सुरुवातीपासून मस्क यांनी जवळपस 40 अब्ज डॉलर्सची (40 Billion Dolors) घसरण झाली आहे. टेस्लाचे सीईओ आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) मालक असलेल्या मस्क यांची नेटवर्थ आता 189 अब्ज डॉलर आहे. ते आता लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांच्यापाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहेत. मस्क यांच्या संपत्तीत झालेली घट प्रामुख्याने टेस्लाच्या शेअरच्या किमतीमुळे झाली आहे, ज्यात या वर्षी जवळपास 29 टक्क्यांची घसरण झाली आहे. (हेही वाचा - Elon Musk Files Case Against OpenAI: एलोन मस्क यांनी ओपनएआय विरुद्ध दाखल केला खटला; CEO Sam Altman वर केला करार मोडल्याचा आरोप)
मस्क यांची नेटवर्थ कमी होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांमध्ये डेलावेअर कोर्टाने 55 अब्ज डॉलर्सचे नुकसान भरपाई पॅकेज नाकाणे आणि सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म एक्स संबंधी काही अडचणी यांचा समावेश आहे. मस्क यांनी 2022 मध्ये ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मस्क यांच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या आहेत.
मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट लवकरच स्मार्ट टीव्ही अॅप लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. अमेझॉन आणि सॅमसंग वापरकर्त्यांना लाँग फॉर्म व्हिडीओज याच्या माध्यमातून स्मार्ट टीव्हीवर पाहाता येणार आहेत. फॉर्चुन रिपोर्चनुसार हे अॅप गुगलच्या टीव्ही अॅप युट्यूबप्रमाणेच मस्क यांचे हे अॅप असणार आहे.