पहिल्या सेलच्या यशानंतर अमेझॉनच्या दुसऱ्या बंपर सेलची घोषणा; मिळणार 90 टक्क्यांपर्यंत सूट
दिवाळीच्या आधी म्हणजे 24 ऑक्टोबर रात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑक्टोबर रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत हा सेल चालू असेल.
सणांच्या दिवसांत इ-कॉमर्स कंपन्यांकडून अनेक ऑफर्स दिल्या जातात. याचमुळे भारतामधील ऑनलाईन खरेदीचे मार्केट दिवसागणिक वाढत आहे. नुकतेच अमेझॉनने ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल’ आयोजित केला होता. 5 दिवसांच्या या सेलमध्ये अक्षरशः लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या सेलचे यश आणि ग्राहकांची डिमांड यांमुळे अमेझॉन आता अजून एक बंपर सेल मार्केटमध्ये घेऊन येत आहे. ‘Wave 2’ असे या सेलचे नाव असून, दिवाळीच्या आधी म्हणजे 24 ऑक्टोबर रात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑक्टोबर रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत हा सेल चालू असेल.
पहिल्या सेलप्रमाणेच या सेलमध्येही एक्सक्ल्यूझिव्ह उत्पादने आणि अनेक ऑफर्स असणार आहेत. या सेलचे वैशिष्ट म्हणजे या सेलमध्ये स्मार्टफोन आणि इतर उत्पादनांवर 90 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
या सेलमधील खास ऑफर्स
> 90 टक्के सूट -
- या सेलमध्ये फॅशन उत्पादनांवर 90 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे, तर 15 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
- घर आणि स्वयंपाकघरातील उत्पादनांवर 80% सवलत, तसेच 10% कॅशबॅक असणार आहे.
- टीव्हीवर 80% सवलत आणि बाकीच्या इतर उत्पादनांवर 60% सवलत देण्यात आली आहे.
> डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर -
या सेलमध्ये आयसीआयसीआय आणि सिटीबँकेच्या ग्राहकांना 10% कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय, याचसोबत नो कॉस्ट EMI सारख्या ऑफर्सदेखील असणार आहेत.
> दररोज रेडमी 6 ए फ्लॅश सेल -
या ऑफर अंतर्गत दररोज दुपारी बारा वाजता फ्लॅश सेल असणार आहे. यात शाओमीचा रेडमी 6A स्मार्टफोन उपलब्ध होईल. याचसोबत या सेलमध्ये भारतातील काही बेस्ट सेलिंग फोन आणि आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतींवरील फोनवर देखील अनेक ऑफर्स असणार आहेत.
> 2 तासांत अल्ट्रा- फास्ट डिलिव्हरी -
या सेल दरम्यान बंगलोर, दिल्ली एनसीआर, मुंबई आणि हैदराबादमध्ये राहणारे लोक प्राइम नाऊ ऍपद्वारे फक्त 2 तासांत अति-जलद डिलिव्हरीचा आनंद घेऊ शकतील.
ऑनलाईन कंपन्यांच्या या ऑफर्सच्या स्पर्धेत एकमेकांवर मात देण्यासाठी अमेझॉनसोबत इतर कंपन्याही पुढे सरसावल्या आहेत. सॅमसंगनेदेखील Upsize Now फेस्टिव्ह सेल सुरू केला आहे. हा सेल 11 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या सेलदरम्यान स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर्स आणि वॉशिंग मशीनवर 25 टक्के त्वरित सूट देण्यात येणार आहे.