Amazon Great Indian Festival Sale: वर्षातील सर्वात मोठ्या ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलची अॅमेझॉनकडून घोषणा, मिळवा 50 टक्क्यांहून अधिक सूट

नवरात्री, दसरा तसेच दिवाळी या तिन्ही सणांची सांगता घालत अॅमेझॉन कडून या सेलची घोषणा करण्यात आली आहे.

Amazon Great Indian Festival Sale: वर्षातील सर्वात मोठ्या ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलची अॅमेझॉनकडून घोषणा, मिळवा 50 टक्क्यांहून अधिक सूट
Amazon (PCc - Pixabay)

सणासूदीच्या दरम्यान अॅमेझॉन कडून दरवर्षीच 4 ते 5 दिवसांचा बंपर (Bumper Sale) सेल असतो. वर्षाभरात विविध सेलची घोषणा (Sale Announcement) अॅमेझॉन (Amazon) कडून केली जात असली तरी वर्षातील हा सर्वात मोठा सेल (Sale) असतो. साधारण ऑक्टोबर (October) महिन्याच्या सुरुवातीस किंवा सप्टेंबर (September) महिन्याच्या अखेरीस हा सेल (Sale) असतो. तरी यावर्षी 23 सप्टेंबर पासून या सेलची सुरुवात होणार आहे. या सेल दरम्यान 50 टक्क्यांहून अधिकची सूट दिली जाते. तरी नवरात्री (Navratri), दसरा (Dasara) तसेच दिवाळी (Diwali) या तिन्ही सणांची सांगता घालत अॅमेझॉन (Amazon) कडून या सेलची (Sale) घोषणा करण्यात आली आहे. तरी एसबीआय बॅंकच्या (SBI) डेबिट कार्डसह (Debit Card) क्रेडीट कार्ड (Credit Card) धारकांना विशेष सुट (Offer) मिळणार आहे. तरी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करण्याच्या मूडमध्ये असाल तर हो हा सेल तुमच्यासाठी आहे.

 

या सेलमध्ये अॅमेझॉनकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic Gadgets), घरगूती वस्तू (Home Shopping), फर्निचर (Furniture), कपडे (Clothes), खेळणी (toys), पुस्तक (Books) यांवर विशेष सूट देण्यात येणार आहे. तसेच आयफोन (iPhone) 14, आयफोन (iPhone) 13, आयफोन (iPhone) 12 वर अॅमेझॉन कडून विशेष सूट देण्यात येणार आहे. तसेच वनप्लस (One Plus), विवो (Vivo), ओपो (Oppo), सॅमसंग (Samsung) या फोनवर देखील अॅमेझॉनकडून विशेष सूट देण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- iPhone Price Update: iPhone 14 च्या लॉंच नंतर iPhone 13 सह iPhone च्या इतरही मॉडेलच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या iPhone 13 आणि iPhone 12 ची नवी किंमत)

 

तसेच तुम्ही टीव्ही (Television), फ्रीज (Fridge), मायक्रोवेव (Microwave), एसी (AC), वॉशिंग मशिन (Washing Machin) घेण्याच्या विचारात असाल तर हा अमेझोनचा सेल तुमच्यासाठी आहे. कारण इलेक्ट्रॉनिक (Electronics) वस्तूवरील 50 टक्क्याहून अधिक सूट (Discount) असल्याची घोषणा अॅमेझॉनने केली आहे. तरी 23 तारखेपासून सुरु होणाऱ्या या सेलबाबत (Sale) ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करणाऱ्यांमध्ये मोठी उत्सूकता दिसून येत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us