iPhone Price Update: iPhone 14 च्या लॉंच नंतर iPhone 13 सह iPhone च्या इतरही मॉडेलच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या iPhone 13 आणि iPhone 12 ची नवी किंमत
iPhone 13 किंवा iPhone 12 खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर लगेच खरेदी करा कारण iPhone च्या किमतीत अॅपल कंपनीकडून मोठी कपात करण्यात आली आहे.
iPhone वापरकर्त्यांना तसेच iPhone नव्या घेण्याऱ्यांना प्रतिक्षा होती ती iPhone14 च्या नव्या सिरिजची (Series). बरेचं दिवसांपासून चर्चेत असलेला iPhone14 आता अॅपल कंपनी कडून लॉंच करण्यात आला आहे. तरी आयफोन युजर्समध्ये (iPhone User) संबंधित iPhone14 बाबत मोठी उत्सुक्ता दिसून येत आहे. पण iPhone 13 किंवा iPhone 12 खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर लगेच खरेदी करा कारण iPhone च्या किमतीत अॅपल (Apple) कंपनीकडून मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच अमेझॉनसह (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) च्या ऑफर सोबच हा iPhone 13 किंवा iPhone 12 तुम्ही ऑर्डर केल्यास तो तुम्हाला आणखीच स्वस्त पडेल. तसेच अपलने iPhone14 लॉंच करताच iPhone 11 डिसकंटिन्यू (Discontinue) केलेला आहे.
अनेकांना आपल्या जवळ आयफोन (iPhone) असावा अशी इच्छा असते. पण आयफोनचे (iPhone) भाव म्हणजे गगनाला भिडलेले. सर्वसामान्यासाठी आयफोन खरीदनं म्हणजे स्वप्नचं. पण आता अपलकडून आयफोनच्या जाहिर करण्यात आलेल्या नव्या दरा नंतर जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर नक्कीच करु शकता. iPhone 13 लाँच (Launch) केले त्यावेळी या फोनची किंमत 79 हजार 900 रुपये होती. परंतु, आता अपलकडून जाहिर करण्यात आलेल्या नव्या दरासह 69 हजार 990 रुपये किंमतीत तुम्ही iPhone 13 खरेदी करू शकता. (हे ही वाचा:- Apple Event 2022: बहुप्रतीक्षित iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max सह अनेक डिव्हाइस लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)
iPhone 13 सह iPhone 12 च्या किमतीत देखील मोठी कपात करण्यात आली आहे. iPhone 12 लाँच (Launch) झाला तेव्हा या फोनची (Phone) किंमत 65 हजार 900 रुपये किंमत होती. तर आता हाच आयफोन 12 फक्त 59 हजार 990 रुपये किंमत उपलब्ध आहे.