Google Prize: दोन भारतीय तरुणांनी गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस

तरी या स्पर्धेत विजयी मिळवल्या बद्दल गुगल कडून या दोन्ही तरुणांना २२ हजार डॉलर रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले आहे.

Google (Photo Credits: Google)

दोन भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर्सने देशाच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.  Google ने एक नवीन बग बाउंटी प्रोग्राम लाँच केला होता. जागतीक स्तरावर लॉंच केलेल्या या प्रोग्राममध्ये जो हॅकर त्रुटी लाखवेल त्याला मजबूत बक्षिस देण्यात येईल, अशी घोषणा गुगल कडून करण्यात आली होती. जगभरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर्सने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. तरी या स्पर्धेत बाजी मारत भारतातील दोन तरुणांनी बिग बाऊंटीमधील त्रुटी उघड करत गुगल कडून घेण्यात आलेली हे स्पर्धा जिंकली आहे. तरी या स्पर्धेत विजयी मिळवल्या बद्दल  गुगल कडून या दोन्ही तरुणांना २२ हजार डॉलर रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले आहे. श्रीराम केएल आणि शिवनेश अशोक अशी या गुगल कडून बक्षीस जिंकणारे दोन भारतीय तरुणांची नावं आहेत.

 

भारतातील दोन हॅकर्सनी Google कडून बग बाउंटी म्हणून एकूण $22000 पेक्षा जास्त रोख बक्षीस जिंकले आहे. हा पुरस्कार मोठ्या टेक कंपन्यांद्वारे त्यांच्या संगणक प्रोग्राम आणि सिस्टममधील त्रुटी ओळखणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. Google ने आपल्या Google क्लाउड प्रोग्राम प्रोजेक्ट्समधील प्रमुख सुरक्षा चक्रे तोडल्याबद्दल एका भारतीय हॅकर जोडीला हा विशिष्ट बग पुरस्कार दिलेला आहे. श्रीराम केएल आणि शिवनेश अशोक हे दोन पुरस्कार विजेते भारतीय हॅकर्स आहेत जे दोघेही Google व्हल्नेरेबिलिटी रिवॉर्ड या कार्यक्रामात सहभाग घेतला होता. (हे ही वाचा:-Microsoft ने चॅटजीपीटी मेकर ओपनएआयमध्ये $10 बिलियनची केली गुंतवणूक)

 

Google VRP प्रोगामध्ये सहभाग घेतलेली गुगलची ही नेमकी स्पर्धा काय आहे जाणून घेवूया. Google व्हल्नेरेबिलिटी रिवॉर्ड्स प्रोग्राम ही बाह्य सुरक्षा संशोधकांनी सुरक्षा धोके शोधण्यासाठी त्यांचे पॅच प्रदान करण्यासाठी एक स्पर्धा आहे. तरी ही स्पर्धा जिंकणाऱ्यास गुगलकडून मजबूत असं बक्षिस दिल्या जातं. तरी या स्पर्धेत जगभरातून कुणीही सहभागी होवू शकतो. तरी यावर्षिची ही स्पर्धा भारतीय सॉफ्टवेअरने जिंकत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif