Shoaib Akhtar ची हज यात्रेतही कमाल, 100mph वेगाने सैतानाला मारला खडा, पहा व्हिडिओ
तो त्याच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचे अपडेट्स देत असतो. हज यात्रेदरम्यान मक्केत सैतानाला दगड मारण्याचा विधी असतो. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएबने नुकताच हा विधी पूर्ण केला.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सध्या हज यात्रेत (Hajj pilgrimage) आहे. या पवित्र धार्मिक यात्रेत ते सौदी अरेबियाचे 'स्टेट गेस्ट' म्हणून सामील झाले आहेत. या हज यात्रेदरम्यान शोएब खूप उत्साही दिसत आहे. तो त्याच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचे अपडेट्स देत असतो. हज यात्रेदरम्यान मक्केत सैतानाला दगड मारण्याचा विधी असतो. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएबने नुकताच हा विधी पूर्ण केला. यासंबंधीचा एक व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, सैतानाला दगड मारण्याची गती मोजली जात नव्हती, परंतु, राग नक्कीच 100 मैल प्रति तास इतका होता.
व्हिडीओमध्ये शोएब अख्तर म्हणतोय की ते सोडायचे नाही. 2002 मध्ये, अख्तर 100 mph च्या वेगाला स्पर्श करणारा जगातील पहिला गोलंदाज बनला होता. 27 एप्रिल 2002 रोजी लाहोरमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ही कामगिरी केली. शोएब अख्तर 2 जुलै रोजी पाकिस्तानहून सौदी अरेबियाला गेला होता.
सौदीच्या मक्का शहरात पोहोचल्यावर त्यांनी येथील प्रसिद्ध मक्का क्लॉक टॉवरवरून 'पवित्र खाना काबा'चे दृश्यही दाखवले. मक्का क्लॉक टॉवरच्या माथ्यावर पोहोचल्यावर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही, त्याने लगेचच एका व्हिडिओद्वारे या टॉवरवरून 'खाना काबा'चे दृश्य दाखवले. शोएबने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.