IPL 2023: रवींद्र जडेजा स्वतःला पाहून झाला अवाक्, आनंदात चाहत्यासाठी असं काही केलं की सगळेच झाले चकित, पहा व्हिडिओ

जडेजा त्याच्या हॉटेलच्या लॉबीमध्ये होता तेव्हा त्याचा एक चाहता त्याच्या समोर आला ज्याच्या हातात त्याची पेंटिंग होती. हे पेंटिंग पाहून जडेजाही चकित झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

IPL 2023: रवींद्र जडेजा स्वतःला पाहून झाला अवाक्, आनंदात चाहत्यासाठी असं काही केलं की सगळेच झाले चकित, पहा व्हिडिओ
Ravindra Jadeja

चार वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जला (CSK) रविवारी त्यांच्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) पराभवाचा सामना करावा लागला. पण यादरम्यान टीमचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) चेहऱ्यावर हसू दिसलं. जडेजासमोर असं काही घडलं की तो चकित झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कोलकाताने चेन्नईचा पराभव केला आणि त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग थोडा कठीण झाला. चेन्नईने कोलकात्याला पराभूत केले असते तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरले असते परंतु कोलकाताने त्यांना सहा विकेट्सने पराभूत केले.

जडेजा त्याच्या हॉटेलच्या लॉबीमध्ये होता तेव्हा त्याचा एक चाहता त्याच्या समोर आला ज्याच्या हातात त्याची पेंटिंग होती. हे पेंटिंग पाहून जडेजाही चकित झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. जडेजाने या पेंटिंगवर सही केली आणि त्यानंतर या चाहत्यासोबत फोटोही काढला. यश प्रजापीत असे हे पेंटिंग बनवणाऱ्या चाहत्याचे नाव असून तो त्याच पद्धतीने पेंटिंग बनवतो. तो एक कलाकार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ¥@$h❤️‍🔥 (@yash_prajapati_art)

जडेजाआधी त्याने हार्दिक पांड्या, एमएस धोनी, रोहित शर्मा यांचीही पेंटिंग्ज बनवली आहेत. या पेंटिंग्सचे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर पाहता येतील.यशने जडेजासोबतचा फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर करत त्याचे आभारही मानले आहेत. जडेजानेही यशच्या पेंटिंगचे कौतुक केले. जडेजाचा हा मोसम काही खास राहिला नाही. हेही वाचा MS Dhoni Signs Jersey For Rinku: चॅपॉकवरील शानदार परफॉर्मेंस नंतर रिंकू सिंगला धोनीकडून मिळाले स्पेशल गिफ्ट (Watch Video)

या मोसमात त्याने आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले असून 19 च्या सरासरीने केवळ 133 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 127.88 आहे आणि त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही. गोलंदाजीत त्याची कामगिरी चांगली झाली आहे. त्याने एकूण 13 सामन्यात गोलंदाजी केली असून 16 बळी घेतले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us