Pro Kabaddi League 7 Season: प्रो कबड्डीमध्ये सिद्धार्थ देसाई ह्याच्यावर करोडो रुपयांची बोली, आईचे स्वप्न सत्यात उतरवणार

प्रो कबड्डीच्या 7 व्या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव 8-9 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे.

Siddharth Desai (Photo Credits-Twitter)

Pro Kabaddi League 7 Season: प्रो कबड्डीच्या 7 व्या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव 8-9 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. तर प्रो कबड्डीच्या खेळाडूंच्या लिलावात यंदा गेल्या वर्षात जबरदस्त कामगिरी करणारा आणि सर्वांच्या पसंदतीस पडलेला खेळाडू सिद्धार्थ देसाई (Siddharth Desai) ह्याच्यावर करोडो रुपयांची बोली लावण्यात आहे. तर चढईपटूंच्या अ श्रेणीतील 8 मधील एका नावाची निवड म्हणून सिद्धार्थचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

यंदाच्या प्रो लीगमधील लिलावामध्ये 441 खेळाडू होते. त्यामध्ये पहिल्या दिवशी अ आणि ब श्रेणीतील खेळाडूंवर बोली लावण्यात आली. त्यावेळी सिद्धार्थ ह्याची अ श्रेणीतून निवडण करण्यात आली आहे. तर सिद्धार्थ देसाई हा यंदाच्या प्रो कबड्डीच्या 7 व्या सीझनमध्ये तेलगू टायटन्स (Telugu Titans) मधून खेळणार असून त्यांनी त्याच्यावर चक्क 1 कोटी 45 लाख रुपयांची बोली लावली आहे. तर गेल्या वर्षी सिद्धार्थ यू मूम्बा संघातून खेळला होता. सिद्धार्थला मिळालेल्या पसंदीमुळे अत्यंत खुश आहे. तसेच माझ्यावर लावण्यात आलेल्या बोलीमधील पैशांमधून आईचे फोर व्हिलरचे स्वप्न पूर्ण करणार आहे. त्याचसोबत जिल्ह्यामधील गरीब कबड्डीपटूंसाठी सुद्धा यामधील रक्कम खर्च करणार असल्याचे सिद्धार्थने सांगितले आहे.

तर येत्या 19 जुलै ते 9 ऑक्टोंबर असा सातव्या सीझनसाठी कालावधी असणार आहे. तसेच प्रत्येक संघाला 4 कोटी 40 लाख रुपयांपर्यंतच बोली लावण्यात यावी असे सांगण्यात आल्यामुळे त्यांनी सावधपणे खेळाडूंवर बोली लावली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif