India Gets Gold In Archery: ज्योती आणि ओजस देवतळेने जिंकले सुवर्णपदक, आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची सर्वोत्तम कामगिरी

यावेळी भारताने 16 सुवर्णांसह 71 पदके जिंकली आहेत. अशा स्थितीत यावेळी भारताला 100 पदके मिळण्याची पूर्ण आशा आहे.

आर्चरीमध्ये ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. त्यांनी दक्षिण कोरियाचा 159-158 असा पराभव केला.  2018 मध्ये भारताने 16 सुवर्णांसह 70 पदके जिंकली. यावेळी भारताने 16 सुवर्णांसह 71 पदके जिंकली आहेत. अशा स्थितीत यावेळी भारताला 100 पदके मिळण्याची पूर्ण आशा आहे. दरम्यान आज महाराष्ट्राचा जगज्जेता ओजस देवताळे आणि अभिषेक वर्मा या भारतीयांमध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारातील पुरुष विभागाची अंतिम लढत रंगणार आहे.  यामुळे हे एक पदक देखील निश्चित मानले जात आहे.

पाहा पोस्ट -

ओजस देवतळे आणि ज्योतीच्या जोडीने तिरंदाजी मिश्र स्पर्धेत भारताला 16 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. मराठमोळा ओजस देवतळे मूळचा नागपूरचा आहे.  ओजसने यापुर्वीही भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif