Tokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी

दुसरी भारतीय खेळाडू यशस्विनी देसवाललाही (Yashaswini Deswal) अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही.

मनु भाकर | File Image | (Photo Credits: PTI)

टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) तिसर्‍या दिवशी भारताची (India) सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत पदक स्पर्धक मनु भाकर (Manu Bhakar) पराभूत झाली आहे. दुसरी भारतीय खेळाडू यशस्विनी देसवाललाही (Yashaswini Deswal) अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. मनु भाकरने चांगली सुरुवात केली होती. मात्र पिस्तूलच्या (Air Gun) समस्येनंतर तिने गती गमावली. 575 गुणांसह पात्रता फेरीत 12 वे स्थान मिळविले. त्याचवेळी यशस्विनी देसवाल 574 गुणांसह या स्पर्धेत 13 व्या स्थानावर आहे. केवळ शीर्ष 8 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

मनू भाकरने पहिल्या फेरीत 98 गुणांसह शानदार सुरुवात केली होती. परंतु त्यानंतर पिस्तूलच्या तांत्रिक अडचणीमुळे त्याला पाच मिनिटे थांबवावे लागले. ज्यानंतर त्याची लय पूर्णपणे खालावली. तिने शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये पुनरागमन केले असले तरी तिच्या शॉटमध्ये ती केवळ 8 गुण मिळवू शकली. त्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली. चीनच्या जियान रँक्सिंगने 587 गुणांसह ऑलिम्पिक विक्रम केला आहे. पात्रता फेरीत प्रथम क्रमांक मिळविला. ग्रीसच्या अ‍ॅना कोराक्की दुसर्‍या आणि रशियन ऑलिम्पिक समितीच्या बी व्हिटालिना तिसर्‍या क्रमांकावर आल्या.

19 वर्षीय मनु भाकरचे ऑलिम्पिक पदकांचे स्वप्न आणि प्रवास अद्याप संपलेला नाही. भाकर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेतही सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम 29 जुलै रोजी होईल. याशिवाय 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र टीम स्पर्धेतही ती सौरभ चौधरी यांच्याशी स्पर्धा करणार आहे. ही स्पर्धा उद्या खेळली जाईल.

दरम्यान भारतासाठी सुखद बातमी म्हणजे बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) पहिल्या सामन्यात अतिशय सुलभ विजय मिळविला आहे. सिंधू अवघ्या 28 मिनिटांत पहिला सामना जिंकण्यात यशस्वी झाली. दुसर्‍या गेममध्ये पीव्ही सिंधूने केसेनियाला 21-10 असे पराभूत केले. पीव्ही सिंधूने 21-9 असा पहिला गेम जिंकला होता. या विजयासह पीव्ही सिंधूने पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

तर दुसरीकडे भारताची स्टार बॉक्सर मेरी कॉम आज आपल्या प्रवासाला प्रारंभ करणार आहे. दुपारी दीड वाजता मेरी कॉम बॉक्सिंग रिंगमध्ये असेल. मेरी कोमचा पहिला सामना डोमिनिका रिपब्लिकच्या हर्नांडेझ गार्सियाशी आहे. रिओ ऑलिम्पिकमधील अपयशापासून मेरी कोम पुढे जाऊ इच्छित आहे.