Kumar Sangakara वर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार यशस्वी
डिहायड्रेशन आणि उच्च तापावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
क्रिकेट विश्वातील नावाजलेला श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा (Kumar Sangakara) याच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक(Ruby Hall Clinic) मध्ये यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. संगकारा यांना 4 जानेवारी रोजी संध्याकाळी 8 वाजता रुग्णालयात दाखल केले होते. डिहायड्रेशन आणि उच्च तापावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रुबी हॉल रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. श्रीधर देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना डिहायड्रेशन झाल्याचे आढळून आले होते आणि 103 डिग्री ताप होता. आम्ही त्यांना दवाखान्यात दाखल करून घेतले आणि त्यांना पुन्हा हायड्रेट केले. हेही वाचा मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar कडून माजी कर्णधर Kapil Dev यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा
दरम्यान कुमार संगकारा विषाणूजन्य डिहायड्रेशन आजारातून लवकर बरे झाला आहे. त्याला काल सामन्यापूर्वी संगकारा यांना डिस्चार्ज देण्यात आला. संगकारा म्हणाला, रुग्णालयातील वास्तव्यादरम्यान माझी उत्तम काळजी घेण्यात आली. त्यामुळेच मी रुग्णालय, डॅाक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा मनःपूर्वक आभारी आहे, असेही संगकारा म्हणाला.