IPL Most Expensive Players List: ऋषभ पंत ठरला यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू; गेल्या 18 वर्षात सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंची 'ही' यादी पहा

प्रत्येक आयपीएल लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंची यादी पाहण्यासाठी खाली वाचा.

Rishabh Pant (Photo Credit - X)

IPL Most Expensive Players List: बहुप्रतिक्षित IPL 2025 चा लिलाव रंजक ठरला. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात फ्रँचायझींनी आवड्या खेळाडूला संघात (Most Expensive Players in IPL)आणण्यासाठी जणू काही त्यांची बँक खाती खाली केली. मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2025 Mega Auction) अनेक खेळाडू मालामाल झाले. यात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल तसेच जोस बटलरसह काही मोठ्या नावांसह, काही फ्रँचायझींनी मोठा पैसा खर्च केला. आयपीएल 18 व्या मोसमासाठी जेद्दाहमध्ये मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शमध्ये 10 फ्रँचायजीत खेळाडूंना घेण्यासाठी चुरस, चढाओढ आणि जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली.

एकूण 10 संघांनी 182 खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. या 182 खेळाडूंवर 639.15 कोटी रुपये खर्च करण्यात आले. अनेक खेळाडूंवर विक्रमी बोली लागली. अनेक खेळाडूंना कोटींची किंमत मिळाली. मात्र त्यातही सर्वाधिक रक्कम घेणारेही खेळाडू आहेत

आयपीएलमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक असलेल्या एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने उद्घाटनाच्या आयपीएल लिलावात 9.5 कोटी रुपयांना विकत घेतले. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने 24.75 कोटी रुपयांना मिचेल स्टार्कला विक्रमी किंमतीवर विकत घेतले. परंतु श्रेयस अय्यर आणि नंतर ऋषभ पंत यांनी आयपीएल 2025 च्या लिलावातील सर्व विक्रम मोडीत काढले. तर, वैभव सूर्यवंशी याच्या नावावर आयपीएल लिलावासाठी सूचीबद्ध होणारा सर्वात तरुण खेळाडू असल्याचा विक्रम नोंदवला गेला.

आयपीएल लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंची यादी

2008- एमएस धोनी (CSK) 9.5 कोटी

2009- केविन पीटरसन (RCB) आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ (CSK) 9.8 कोटी

2010- किरॉन पोलार्ड (MI) आणि शेन बाँड (KKR) 4.8 कोटी

2011- गौतम गंभीर (KKR) 14.9 कोटी

2012- रवींद्र जडेजा (CSK) 12.8 कोटी

2013- ग्लेन मॅक्सवेल (MI) 6.3 कोटी

2014- युवराज सिंग (RCB) 14 कोटी

2015- युवराज सिंग (DC) 16 कोटी

2016- शेन वॉटसन (RCB) 9.5 कोटी

2017- बेन स्टोक्स (RPSG) 14.5 कोटी

2018- बेन स्टोक्स (RR) 12.5 कोटी

2019- जयदेव उनाडकट (RR) आणि वरुण चक्रवर्ती (PBKS) 8.4 कोटी

2020- पॅट कमिन्स (KKR) 15.5 कोटी

2021- ख्रिस मॉरिस (RR) 16.25 कोटी

2022- इशान किशन (MI) 15.25 कोटी

2023- सॅम कुरन (PBKS) 18.5 कोटी

2024- मिचेल स्टार्क (KKR) 24.75 कोटी

2025- (LSG) 27 कोटी

एकूणच, आयपीएल 2025च्या मेगा लिलावात एकूण 182 खेळाडूंवर स्वाक्षरी करण्यात आली असून, खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी फ्रँचायझींनी एकूण 639.15 कोटी रुपये खर्च केले आहेत. सर्व संघ एकत्र आल्याने, 10 आयपीएल संघ आता हळूहळू आयपीएल 2025 हंगामाची तयारी सुरू करण्यास उत्सुक असतील.