How To Download Hotstar & Watch KXIP Vs CSK Live Match: किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: File Image)

KXIP Vs CSK 18th IPL Match 2020: इंडियन प्रीमिअर लीग 2020च्या (Indian Premier League 2020) आठराव्या सामन्यात आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज (Kings XI Panjab Vs Chennai Super Kings) एकमेकांशी भिडणार आहेत. दुबईच्या आंतराष्ट्रीय मैदानात हा सामना पार पडणार आहे.  या हंगामात पंजाब आणि चेन्नई या दोन्ही संघाने 4 पैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर, तिन्ही सामने गमावले आहेत.आयपीएलच्या  गुणतालिकेत पंजाब सातव्या तर, चेन्नईचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- IPL 2020: बेन स्टोक्सची आज होणार पहिली COVID टेस्ट, राजस्थान रॉयल्ससाठी मैदानावर उतारण्यावर मिळाला अपडेट

हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-

- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.