WPL 2025 Retention Full List: आगामी महिला प्रीमियर लीगसाठी सर्व संघांनी रिटेंशन याद्या केल्या जाहीर, जाणून घ्या कोणत्या खेळाडूंना सोडण्यात आले

या क्रमाने, सर्व संघांनी आपापल्या गरजेनुसार खेळाडूंवर दांव लावला असून उर्वरित खेळाडूंना सोडले.

Women's Premier League 2025 Retention Full List:  महिला प्रीमियर लीग 2025 (Women's Premier League 2025) च्या आगामी हंगामासाठी सर्व संघांनी रिटेन ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने (BCCI)  सर्व संघांना रिटेनर्सच्या यादीसाठी गुरुवार 7 नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिली होती. तथापि, सर्व संघांनी त्यांची यादीजाहीर केली आहे . रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूपासून  (Royal Challengers Bengaluru)  मुंबई इंडियन्सपर्यंत (Mumbai Indians)  सर्वच संघांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना कायम ठेवले आहे. (हेही वाचा - RCB Women Retained Players List WPL 2025: चॅम्पियन RCB ची रिटेंशन यादी जाहीर, स्मृती मानधनासह 14 खेळाडू कायम )

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) कर्णधार स्मृती मानधना यांच्यासह प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. या क्रमाने, सर्व संघांनी आपापल्या गरजेनुसार खेळाडूंवर दांव लावला असून उर्वरित खेळाडूंना सोडले.

आरसीबीने या खेळाडूंना कायम ठेवले: स्मृती मानधना (कर्णधार), सबिनेनी मेघना, रिचा घोष, एलिस पेरी, जॉर्जिया वॅरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, सोफी डेव्हाईन, रेणुका सिंग, सोफी मॉलिनक्स, एकता बिष्ट, केट क्रॉस, कनिका अहुजात

सोडलेले खेळाडू: दिशा कसाट, इंद्राणी रॉय, नदीन डी क्लार्क, शुभा सतीश, श्रद्धा पोक्कर आणि सिमरन बहादूर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे आता 3.25 कोटी रुपये शिल्लक आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूंना कायम ठेवले

दिल्ली कॅपिटल्सने हे खेळाडू कायम ठेवले: ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, मारिजन कॅप, मेग लॅनिंग (कर्णधार), मिन्नू मणी, राधा यादव, शेफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू आणि अण्णा सदरलँड

या खेळाडूंना सोडले: लॉरा हॅरिस, अश्वमी कुमारी, पूनम यादव आणि अपर्णा मंडल.

दिल्ली कॅपिटल्सने 14 खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि आता त्यांच्या पर्समध्ये 2.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.

मुंबई इंडियन्सने आपल्या प्रमुख खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला

मुंबई इंडियाने या खेळाडूंना कायम ठेवले: हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, यस्तिका भाटिया, अमनजोत कौर, सायका इशाक, जिंतीमनी कलिता, एस सजना, फातिमा जाफर, नॅट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन आणि शबन, कीर्तन बालकृष्ण.

या खेळाडूंना सोडले: प्रियांका बाला, हुमैरा काझी, फातिमा जाफर आणि इसाबेल वोंग.

मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये सध्या 2.65 कोटी रुपये शिल्लक आहेत.

यूपी वॉरियर्सने या खेळाडूंना कायम ठेवले

यूपी वॉरियर्सने या खेळाडूंना कायम ठेवले: ॲलिसा हिली (कर्णधार), किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी, उमा छेत्री, पूनम खेमनार, सायमा ठाकोर, गौहर सुलताना, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, सोफी एक्लेस्टोन, दीप्ती सेता, दीप्ती शर्मा आणि वृंदा दिनेश.

या खेळाडूंना सोडले: लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, एस यशश्री आणि लॉरेन बेल.

खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर यूपी वॉरियर्सकडे 3.9 कोटी रुपये शिल्लक आहेत.

गुजरात टायटन्सने स्नेह राणाला सोडले

गुजरात टायटन्सने आगामी हंगामासाठी या खेळाडूंना कायम ठेवले: हरलीन देओल, दयालन हेमलता, तनुजा कंवर, शबनम शकील, मन्नत कश्यप, सायली सथगरे, मेघना सिंग, प्रिया मिश्रा, बेथ मुनी, ऍशले गार्डनर, लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफिल्ड, गौतम आणि भारती फुलमाळी.

या खेळाडूंना सोडण्यात आले: स्नेह राणा, कॅथरीन ब्राइस, त्रिशा पुजिथा, वेदा कृष्णमूर्ती, त्रानाम पठाण आणि ली ताहुहू.

गुजरात टायटन्सकडे सध्या 4.4 कोटी रुपये शिल्लक आहेत, जे इतर संघांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.