World's Richest Cricketer Aryaman Birla: वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आर्यमन बिर्लाची क्रिकेटमधून निवृत्त; विराट-धोनीपेक्षा श्रीमंत, 'इतक्या' कोटींचा मालक आहे तरी कोण?

त्याने क्रिकेटला पूर्णविराम दिल्यानंतर वडील कुमार मंगलम बिर्ला यांचा व्यवसाय हाती घेतला आहे.

Photo Credit- X

Aditya Birla Fashion and Retail Director Aryaman Birla: भारतीय क्रिकेट संघात सध्या सर्वात श्रीमंत खेळाडू असा प्रश्न कोणी विचारला तर सर्वात आधी विराट कोहलीचे नाव समोर येते. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर यांचे नाव येईल असे सर्व म्हणतील. मात्र, हे खोट आहे. धोनी-विराट-सचिन यांच्यापेक्षा कैकपटीने आणि जगात श्रीमंत असा एक भारतीय यूवा क्रिकेटपटू (World's Richest Cricketer) आहे. आर्यमान बिर्ला (Aryaman Birla) असे त्या क्रिकेटपटूचे नाव आहे. त्याची संपत्ती हजार कोटींहून अधिक आहे. तो अवघ्या 22 वर्षाचा आहे. त्याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घोषित (Aryaman Birla Retires from Cricket) केली. त्यामुळे आर्यमान बिर्ला हा आता चर्चेचा विषय बनला आहे.

आर्यमन बिर्ला हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. त्याने क्रिकेटला पूर्णविराम दिल्यानंतर वडील कुमार मंगलम बिर्ला यांचा व्यवसाय हाती घेतला आहे. कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला अँड रिटेल लिमिटेडचे मालक आहेत. एवढी अफाट संपत्ती असूनही क्रीकेटची आवड असल्याने आर्यमनने काही काळ क्रीकेट खेळला. मात्र, तो कधीही भारतासाठी किंवा कोणत्याच आयपीएल टीमसाठी खेळला नाही. मात्र तरीही त्याने संपत्तीच्या बाबतीत मोठ्या खेळाडूंना धोबीपछाड केले आहे.(Who Is Venkata Datta Sai?: कोण आहे वेंकट दत्ता साई? दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूसोबत अडकणार लग्नबंधणार)

बिर्ला फॅशन आणि रिटेल लिमिटेडमध्ये संचालक

कुमार मंगलम हे अब्जाधीश आहेत. 2023 मध्ये, आर्यमनला आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल लिमिटेडमध्ये संचालक म्हणून सामील करण्यात आले. आर्यमनने मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफी आणि इतर स्पर्धा खेळल्या आहेत.

अशी होती कारकिर्द

1997 मध्ये मुंबईत जन्मलेल्या आर्यमनने मध्य प्रदेशमधील रीवा येथून ज्युनियर सर्किट क्रिकेटमध्ये भाग घेतला. 2017 मध्ये, त्याने मध्य प्रदेशकडून ओरिसा विरुद्ध रणजी करंडक क्रिकेटमधून पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात आर्यमनने रजत पाटीदारसोबत 72 धावांची भागीदारी केली. एका वर्षानंतर आर्यमनने बंगालविरुद्ध चमकदार कामगिरी केली. त्या सामन्यात आर्यमान बिर्लाने 189 चेंडूत 103 धावांची शानदार खेळी करत सामना अनिर्णित ठेवला. 2018 मध्ये, आर्यमन राजस्थान रॉयल्सचा भाग होता. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. 2019 मध्ये त्याने क्रिकेटमधून लक्ष काढून व्यवसायात गुंतला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif