T20 World Cup 2024 मध्ये Team India चा सामना होणार 'या' 4 संघांशी, जाणून घ्या IND vs PAK कधी होणार सामना

भारतीय चाहत्यांना या विश्वचषकाकडून विशेष अपेक्षा आहेत कारण टीम इंडियाने (Team India) दीर्घकाळ एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. याशिवाय या विश्वचषकातील एका सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हा सामना क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या सामन्यांमध्ये गणला जातो

T20 World Cup 2024 मध्ये Team India चा सामना होणार 'या' 4 संघांशी, जाणून घ्या IND vs PAK कधी होणार सामना
IND vs PAK (Photo Credit - Twitter)

T20 World Cup 2024 Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी 2024 हे वर्ष महत्त्वाचे असणार आहे. या वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळवला जाणार आहे. सध्या टी-20 हा सर्वात लोकप्रिय फॉरमॅट आहे आणि त्यामुळेच या विश्वचषकावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारतीय चाहत्यांना या विश्वचषकाकडून विशेष अपेक्षा आहेत कारण टीम इंडियाने (Team India) दीर्घकाळ एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. याशिवाय या विश्वचषकातील एका सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हा सामना क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या सामन्यांमध्ये गणला जातो. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हा सामना आहे. हा सामना कधी होणार याची तारीख आता समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेत आमनेसामने येतात. त्यामुळे हा सामना अधिक खास बनला आहे. गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते आणि भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता. यावेळीही टीम इंडिया तसाच प्रयत्न करणार आहे. (हे दखील वाचा: IND vs SA 2nd Test Day 2 Live Scoe Update: दक्षिण आफ्रिकेच्या सहा विकेट पडल्या, बुमराहला मिळाले चौथे यश, मार्करामचे अर्धशतक)

असे अशु शकते वेळापत्रक

यंदाच्या टी-20 विश्वचषकाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नसले तरी क्रीडा क्षेत्रातील वृत्तानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. या विश्वचषकात भारताचा हा दुसरा सामना असेल. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. 12 जून रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारताचा सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. टीम इंडिया 15 जूनला कॅनडाशी भिडणार आहे. म्हणजेच या गटात भारतासमोर खरे आव्हान पाकिस्तानचेच असेल. पण सांख्यिकीय दृष्टिकोनातून हे आव्हान फार मोठे नाही कारण 2007 पासून टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताला फक्त एकदाच पराभूत केले आहे.

टी-20 विश्वचषकात एकूण 20 संघ होणार सहभागी

यंदा होणारा टी-20 विश्वचषक खूपच वेगळा असेल. यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यापैकी 12 संघ मुख्य फेरीत प्रवेश करतील. यानंतर सुपर-8 फेरी होईल. त्यानंतर उपांत्य फेरी आणि नंतर अंतिम फेरी. 2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने मजल मारली होती, पण इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. 2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला आणि विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला.

(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2024 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).