IND vs BAN: टीम इंडियाने इंग्लंडला मागे टाकून केला नवा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा संघ

टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. कमी षटकात फलंदाजीकरून कसोटी जिंकणारा जगातील दुसरा संघ बनला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला मागे टाकून असा एक नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला.

IND vs BAN: टीम इंडियाने इंग्लंडला मागे टाकून केला नवा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा संघ
Photo Credit- X

IND vs BAN: टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची 2 कसोटी (IND vs BAN 2nd Test) मालिका 2-0 ने जिंकली. कानपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी करत बांगला टायगर्सचा पराभव केला. या सामन्यात भारताने अनेक विक्रम केले आहेत. दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताने विशेष कामगिरी केली. भारतीय संघाने इंग्लंडला मागे टाकले असून कमीत कमी षटके फलंदाजी करून कसोटी जिंकणारा जगातील दुसरा संघ बनला आहे. भारताआधी दक्षिण आफ्रिका या यादीत आहे. (हेही वाचा: Yashasvi Jaiswal Wins Player of the Match: यशस्वी जैस्वाल ठरला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी; भारताने बांगलादेश विरुद्ध 2-0 ने जिंकली मालिका)

विशेष कामगिरी भारतीय संघाच्या नावावर

कसोटी सामन्यात सर्वात कमी षटके ठोकून सामना जिंकणारा भारत आता जगातील दुसरा संघ बनला आहे. भारताने या सामन्यात 52 षटकांची फलंदाजी केली सामना जिंकला. सर्वात कमी षटके फलंदाजी करून सामना जिंकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. आफ्रिकेने 46.5 षटकांत फलंदाजी करत सामना जिंकला. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड आहे. ज्याने 61 षटकांची फलंदाजी करून सामना जिंकला. चौथ्या क्रमांकावर स्व:त बांगलादेश आहे. त्यांनी 89.4 षटकांत सामना जिंकला. तर ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी 101.4 षटकात सामना जिंकला.

सर्वात कमी षटके फलंदाजी करून सामना जिंकला

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 233 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने स्फोटक फलंदाजी करत 34.4 षटकात 285/9 धावा करत डाव घोषित केला. दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव 146 धावांवर आटोपला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १७.२ षटकांत ९८/३ धावा करून सामना जिंकला. आता भारतीय संघ कसोटीत सर्वात कमी षटके खेळून सामना जिंकणारा जगातील दुसरा संघ बनला आहे.

भारताने बांगलादेशविरुद्ध शानदार कामगिरी करत 3 दिवसांच्या खेळात सामना जिंकून इतिहास रचला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 50,100 आणि 200 धावा करण्याचा पराक्रम केला. भारताने पहिला डाव 285/9धावांवर घोषित केला.

(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2024 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).