PAK vs SA 2021: पाकिस्तानमध्ये दाखल दक्षिण आफ्रिका संघासाठी कडक सुरक्षा, फिरकीपटू तबरेज शम्सीने सुरक्षा व्यवस्थेची दिली माहिती, पहा व्हिडिओ

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कडक सुरक्षा पुरवल्यामुळे ते प्रभावित झाले. शनिवारी कराची येथे आल्यानंतर पाकिस्तानात कडक बंदोबस्त ठेवल्याबद्दल तबरेज शम्सीने अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वातील संघाला विमानतळावरून हॉटेलमध्ये नेण्यात आले.

दक्षिण आफ्रिका संघासाठी कडक सुरक्षा (Photo Credit: Twitter)

Security for South Africa Team in Pakistan: दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये (Pakistan) दाखल झाला आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये 26 जानेवारीपासून कसोटी मालिकेने दौऱ्याची सुरुवात होईल. त्यापूर्वी, 16  जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेचा 21 सदस्यीय संघ पाकिस्तानमध्ये पोहचला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव क्रिकेट संघ आणि संबंधित क्रिकेट मंडळे सामान्यत: आपल्या खेळाडूंना पाकिस्तान पाठविण्यास इच्छुक नसतात. परिणामी, बहुतेक वेळा पीसीबीने (PCB) युएईमध्ये संघाचे सामने आयोजित केले आहेत. तथापि, अन्य देश आता पाकिस्तान खेळण्यासाठी दौर्‍याचे वेळापत्रक आखण्याच्या विचारात असल्याने हळूहळू परिस्थिती बदलत आहे. दक्षिण आफ्रिकी संघ देखील तब्बल 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर देशात दाखल झाला आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) कडक सुरक्षा पुरवल्यामुळे ते प्रभावित झाले. शनिवारी कराची येथे आल्यानंतर पाकिस्तानात कडक बंदोबस्त ठेवल्याबद्दल तबरेज शम्सीने (Tabraiz Shamsi) अधिकाऱ्यांचे कौतुक केले. (Babar Azam Sexual Harassment Allegations: बाबर आझमला लाहोर कोर्टाचा दणका, लैंगिक छळाच्या आरोपाखाली FIR चे दिले आदेश)

यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या राज्य-सुरक्षा पातळीवर यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वातील संघाला विमानतळावरून हॉटेलमध्ये नेण्यात आले. शम्सीने सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक करत दोन ट्वीट केले. व्हिडिओ शेअर करत स्पिनरने ट्विट केले की, “सुरक्षा कडक आहे!”

त्यानंतर, पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकार्‍यांच्या हातात बंदूक असल्याचा फोटो शेअर करत आफ्रिकी क्रिकेटपटूने ‘कॉल ऑफ ड्यूटी’ असे कॅप्शन दिले. “खरी कॉल ऑफ ड्यूटी. ही मुले छोट्या बंदुकाने खेळत नाहीत आणि त्यांना कामाशी मतलब आहे!” शम्सीने  लिहिले.

मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला क्वारंटाइन होत इतर कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये आयसोलेशनमध्ये रहावे लागेल, ज्यानंतर त्याची कोरोना व्हायरस टेस्ट केली जाईल. या टेस्टचे अहवाल प्राप्त मिळाल्यानंतर त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सराव सत्र आयोजित करण्याची परवानगी दिली जाईल.