RCB vs PBKS Head to Head Record ahead of IPL 2025 Final: पंजाब आणि बंगळुरूमध्ये कोणता संघ आहे वरचढ? फायनलपूर्वी हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाका

RCB vs PBKS Head to Head Record ahead of IPL 2025 Final: पंजाब आणि बंगळुरूमध्ये कोणता संघ आहे वरचढ? फायनलपूर्वी हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाका
RCB vs PBKS (Photo Credit- X)

RCB vs PBKS head to head record ahead of IPL 2025 Final: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. 2022 नंतर पहिल्यांदाच आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार असल्याने या जेतेपदाच्या सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे दोन्ही संघ 18 वर्षांपासून त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या (IPL 2025 Final) शोधात आहेत. त्यापैकी एकाचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. या संपूर्ण हंगामात बंगळुरू आणि पंजाब (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) दोन्ही संघांची कामगिरी सर्वोत्तम राहिती होती. क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीने पंजाबचा पराभव केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले तर पंजाबने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक अंतिम सामना अपेक्षित आहे.

RCB vs PBKS Final, Ahmedabad Weather Forecast: मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज टाटा आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये पाऊस गोंधळ घालेल? कसे असेल सामन्यादरम्यान वातावरण? वाचा

बंगळुरू आणि पंजाब हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात एकूण 36 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये आरसीबीने 18 सामने जिंकले आहेत आणि पीबीकेएसने 18 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी समान सामने जिंकले आहेत. आकडेवारीवर विश्वास ठेवला तर, दोन्ही संघांमध्ये नेहमीच तीव्र स्पर्धा राहिली आहे आणि कोणीही अंतिम सामना जिंकू शकतो, कोणताही संघ फेव्हरिट नाही. तथापि, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या 5 सामन्यांमध्ये आरसीबीने वरचढ कामगिरी केली आहे. आरसीबीने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत.

पंजाब 11 वर्षांनी, आरसीबी 9 वर्षांनी फायनलमध्ये

पंजाब किंग्ज 11 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. गेल्या वेळी 2014 मध्ये त्यांनी केकेआरसोबत अंतिम सामना खेळला होता. पंजाब फक्त दुसऱ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळत आहे. दुसरीकडे, हा आरसीबीचा चौथा आयपीएल फायनल आहे. बंगळुरूने 9 वर्षांपूर्वी 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटचा आयपीएल फायनल खेळला होता.

श्रेयस अय्यरला सलग दुसऱ्यांदा आयपीएल जिंकण्याची संधी

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून सलग दुसऱ्यांदा आयपीएल जिंकण्याची संधी आहे. गेल्या वर्षी, त्याच्या नेतृत्वाखाली त्याने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते. या वर्षी तो पंजाब किंग्जसोबत पुन्हा आयपीएलची ट्रॉफी उचावू शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 12:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).