आयपीएल जिंकल्यानंतर Rashid Khan चा खुलासा; 'Gujarat Titans च्या 'या' युवा खेळाडूला बॉलिंग करणे आहे खूपच कठीण'
2017 मध्ये राशिदने आयपीएल खेळायला सुरवात केली, तेव्हापासून हे सहाव्यांदा झाले आहे की राशिद खानने एका सीझनमध्ये 17 पेक्षा जास्त विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत.
यंदा आयपीएलमध्ये (IPL 2022) राशिद खानने (Rashid Khan) त्याचा फॉर्म दाखवत कमालीची कामगिरी केली. त्याने 16 मॅचमध्ये 6.60 च्या इकॉनॉमी ने 19 विकेट आपल्या नावावर केल्या. 2017 मध्ये राशिदने आयपीएल खेळायला सुरवात केली, तेव्हापासून हे सहाव्यांदा झाले आहे की राशिद खानने एका सीझनमध्ये 17 पेक्षा जास्त विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. असे फार कमी खेळाडू आहेत जे राशिद खानच्या बॉलिंगवर चांगल्या प्रकारे खेळू शकतात. आता राशिद खानने स्वतः अशा एका युवा गोलंदाजांचे नाव सांगितले आहे ज्याला बॉलिंग करणे फारच कठीण वाटते.
याबाबत खुलासा करत राशिद म्हणाला, 'शुभमन गिल (Shubman Gill) फॉर्ममध्ये आहे आणि त्याने टीमसाठी मॅच विनिंग इंनिंग खेळल्या आहेत. एक फलंदाज म्हणून तो उत्तम आहे परंतु मला वाटते की त्याला गोलंदाजी करणे खूप कठीण वाटते. सुदैवाने गिल हा माझ्याच संघात आहे. गिल हा खूप मेहनती खेळाडू असून त्याच्यासोबत खेळताना खूप पॉझिटीव्ह एनर्जी मिळते.' अशाप्रकारे आयपीएल 2022 फायनलनंतर राशिद खानने भाष्य केले.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या सुरुवातीच्याच सामन्यात गिलने अर्धशतकी खेळी करून तो फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. पण नंतरच्या काही मॅचमध्ये त्याला मोठी खेळी करता आली नाही. परंतु फायनलमध्ये उत्तम खेळी करत विजयी षटकार मारून त्याने टीमला विजेतेपद पटकावून दिले . गिलने 16 मॅचमध्ये 34.50 च्या सरासरीने 365 धावा केल्या.
दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर, मार्गदर्शक गॅरी कर्स्टन यांनी हार्दिक पांड्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, 'विजेतेपद विजेता कर्णधार अतिशय नम्र आहे. तो विलक्षण आहे. हार्दिक हा भारतातील एक हाय-प्रोफाइल खेळाडू असून देखील तो अतिशय नम्र आहे, त्याला एक लिडर म्हणून शिकायचे आहे आणि त्याच्या खेळाडूंशी जोडलेले राहायचे आहे. माझ्यामते हे फार महत्वाचे आहे. त्याने युवा खेळाडूंना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि एक मोठी जबाबदारी लीलया पार पाडली.'