Preity Zinta: चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसली; मैदानावरील प्रिती झिंटाचे फोटो व्हायरल, चाहतेही झाले भावूक (Video)
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा पराभव झाल्यानंतर टीमची सहमालकीण प्रिती झिंटाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट पहायला मिळतेय.
Preity Zinta: आयपीएलचं जेतेपद पटकावण्याचं स्वप्न अखेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) काल पूर्ण केल. तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत ट्रॉफी (IPL 2025 Winner) उंचावल्यानंतर झाला. एकीकडे आरसीबीने ऐतिहासिक विजय मिळवला, तर दुसरीकडे अभिनेत्री प्रिती झिंटा सहमालकीण असलेल्या पंजाब किंग्जला (PBKS) पराभव सहन करावा लागला. या पराभवानंतर प्रितीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट पहायला मिळत होती. संपूर्ण सिझनमध्ये पंजाब किंग्जची कामगिरी टॉपची होती. त्यामुळे संघाने फायनलमध्ये धडक दिली. त्यांच्या विजयाची शक्यताही अधिक होती. आयपीएलच्या इतिहासात पंजाबच्या टीमनेही आतापर्यंत ट्रॉफी पटकावली नव्हती. हाती आलेल्या पराभवावर प्रितीची नाराजी जगजाहीर झाली.
मंगळवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर प्रिती तिच्या चेहऱ्यावरील दु:ख लपवू शकत नव्हती. आपल्या टीमसाठी वाटणारं वाईट आणि हताशपणा तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता. मैदानावरील प्रितीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मॅच संपल्यानंतर ती मैदानात अत्यंत निराश होऊन चालताना दिसत आहे. अंतिम सामन्यात ती पांढऱ्या रंगाचा कुर्ता, सलवार आणि लाल दुपट्टा अशा पारंपरिक पोशाखात दिसली होती. कर्णधार श्रेयस अय्यरसह इतर स्पर्धकांचं सांत्वन करतानाही ती दिसली.
प्रीति जिंटा से आँखें तक नहीं मिला पा रहे श्रेयस अय्यर
लेकिन प्रीति जिंटा की तारीफ़ करनी होगी अपने कप्तान का ढांढस बढ़ाने पहुँची
लेकिन दोनों भावुक हो गए #RCBvsPBKS #pritizinta #ShreyasIyer pic.twitter.com/L78Be8MqIr
— Manish Gaur (@Manishgaur__) June 3, 2025
प्रितीच्या फोटो, व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘प्रितीसुद्धा 18 वर्षांपासून ट्रॉफीची प्रतीक्षा करत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू स्पष्ट दिसत आहेत. पुन्हा तिचा अपेक्षाभंग झाला.’, असं एका चाहत्याने लिहिलं. तर ‘प्रिती झिंटा दरवर्षी तिच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी इतक्या मैलाचा प्रवास करून येते. ती तिच्या टीमच्या चांगल्या-वाईट क्षणी सोबत होती. तिने कधीच कोणाला ट्रोल केलं नाही. आज तिच्याविषयीचा आदर आणखी वाढला आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तू खंबीर राहा प्रिती, आपण एकेदिवशी नक्कीच जिंकू’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

