Most Runs & Wicket In IPL 2025: निकोलस पूरनने ऑरेंज कॅप तर, नूर अहमदने पर्पल कॅप मिळवली; पहा टॉप-5 धावा करणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाजांची यादी

आयपीएल 2025 मध्ये अजून बरेच सामने शिल्लक आहेत आणि प्रत्येक सामन्यासोबत ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी स्पर्धा अधिक रोमांचक होत जात आहे.

Most Runs & Wicket In IPL 2025: निकोलस पूरनने ऑरेंज कॅप तर, नूर अहमदने पर्पल कॅप मिळवली; पहा टॉप-5 धावा करणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाजांची यादी

Most Runs & Wicket In IPL 2025: आयपीएल 2025 लीगमध्ये एकूण १० संघ जेतेपदासाठी लढत आहेत. प्रत्येक सामन्यानंतर, संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी जोरदार स्पर्धा करत असल्याने, सर्वांचे लक्ष पॉइंट्स टेबलवर असते. आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) मध्ये अजून बरेच सामने शिल्लक आहेत आणि प्रत्येक सामन्यासोबत ऑरेंज कॅप (Orange Cap IPL) आणि पर्पल कॅपसाठी(Purple Cap IPL) स्पर्धा अधिक रोमांचक होत जाईल. हंगामाच्या अखेरीपर्यंत कोणता फलंदाज आणि गोलंदाज अव्वल स्थानावर राहील हे पाहणे रोमांचक राहिल.

आयपीएल 2025 ऑरेंज कॅप यादी

क्रमांक खेळाडू मॅच डाव रन सरासरी स्ट्राइक रेट चौकार षटकार
1 निकोलस पूरन 4 4 201 50.25 218.48 18 16
2 साई सुदर्शन 4 4 191 47.75 150.39 16 9
3 मिशेल मार्श 4 4 184 46.00 185.86 22 10
4 सूर्यकुमार यादव 4 4 171 57.00 161.32 15 8
5 जोस बटलर 4 4 166 55.33 167.67 14 9

गेल्या हंगामात विराट कोहलीने 741 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती. आयपीएलच्या इतिहासात डेव्हिड वॉर्नरने तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला क्षेत्ररक्षण करताना ऑरेंज कॅप घालण्याची संधी मिळेल. ज्यामुळे तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असल्याचे दिसून येईल. जर दुसऱ्या फलंदाजाने त्याला मागे टाकले तर ऑरेंज कॅप नवीन फलंदाजाला मिळेल. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात ही कॅप अनेक वेळा बदलत राहते. शेवटी, स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते.

आयपीएल 2025 पर्पल कॅप यादी

क्रमांक खेळाड मॅच ओवर चेंडू विकेट सरासरी रन 4 विकेट 5 विकेट
1 नूर अहमद 3 12.0 72 9 9.11 82 1 -
2 मिचेल स्टार्क 3 11.4 70 9 13.77 124 - 1
3 मोहम्मद सिराज 4 16.0 96 9 9.37 75 1 -
4 हार्दिक पंड्या 3 10.0 60 8 9.37 75 - 1
5 आर साई किशोर 4 16.0 96 8 14.12 113 - -

गेल्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना हर्षल पटेलने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली. त्याच वेळी, भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमध्ये सलग दोनदा (2016 आणि 2017) पर्पल कॅप जिंकणारा एकमेव गोलंदाज आहे. एखाद्या विशिष्ट आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत गोलंदाज इतर गोलंदाजांना मागे टाकतो तेव्हा त्याला पर्पल कॅप दिली जाते. ऑरेंज कॅप प्रमाणेच, पर्पल कॅप गोलंदाज क्षेत्ररक्षण करताना घालतो आणि हंगामातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून ओळखला जातो.

(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2025 10:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).