Irani Trophy 2024: रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध मुंबईची पहिल्या दिवशी शानदार कामगिरी, अजिंक्य रहाणे-श्रेयस अय्यर आणि सरफराज खानचे अर्धशतके
दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईचा डाव हा 68 षटकानंतर 4 बाद 237 धावा झाल्या आहेत.
Mumbai vs Rest of India Irani Cup 2024 Day 1 Scorecard: : इराणी ट्रॉफी 2024 स्पर्धेत आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऋतुराज गायकवाडच्या बाजूने लागला. ऋतुराजने लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे आणि हार्दिक तामोरे स्वस्तात बाद झाले. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांची भागीदारी महत्त्वाची ठरली. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी 102 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यर 84 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 57 धावा करून बाद झाला. (हेही वाचा - Mumbai vs Rest of India Irani Cup 2024 Live Streaming: इराणी चषक स्पर्धेत मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया आज आमनेसामने; सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? येणार जाणून घ्या)
श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने पाचव्या विकेट साठी सरफराज खान सोबत नाबाद 97 धावांची धागीदारी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईचा डाव हा 68 षटकानंतर 4 बाद 237 धावा झाल्या आहेत. मुंबईकडून अजिंक्य रहाणे 1 षटकार आणि 6 चौकाराच्या मदतीने 86 धावा करून नाबाद आहे. तर सरफराज खान हा 6 चौकाराच्या मदतीने 54 धावांवर खेळत आहे. रेस्ट ऑफ इंडियाकडून मुकेश कुमारने 3 तर यश दयालने 1 विकेट घेतला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, एम जुनेद खान, मोहित अवस्थी.
रेस्ट ऑफ इंडिया (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुधरसन, इशान किशन, ध्रुव जुरेल (डब्ल्यू), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, मुकेश कुमार, प्रसीद कृष्णा