IPL New Rules 2022: बायो-बबलचे उल्लंघन करणे टीम आणि खेळाडूंना भारी, BCCI ने नियमात केले मोठे फेरबदल; जाणून घ्या संपूर्ण Guidelines

IPL 2022 New Rules: इंडियन प्रीमियर लीग 2022 26 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी लीगमध्ये बरेच काही नवीन पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022 साठी आणखी काही नवीन नियम जरी केले आहेत ज्यामुळे स्पर्धा अधिक मजेदार होईल. तसेच IPL 2022 दरम्यान खेळाडू आणि संघ अधिका-यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास गंभीर निर्बंध लादले जातील.

आयपीएल 2022 (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 New Rules: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 सीजन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी लीगमध्ये बरेच काही नवीन पाहायला मिळणार आहे. लीगमधील संघांची संख्या 8 वरून 10 झाली असून या संघांमध्ये एकूण 70 सामने खेळले जातील. हे सर्व सामने मुंबई आणि पुण्यात खेळले जाणार आहेत. या दरम्यान आता बीसीसीआयने (BCCI) आयपीएल (IPL) 2022 साठी आणखी काही नवीन नियम जरी केले आहेत ज्यामुळे स्पर्धा अधिक मजेदार होईल. असे काही नियम आहेत जे दोन्ही संघांना फायदेशीर ठरतील आणि असे काही नियम आहेत ज्यांचा फायदा फक्त एकाच संघाला होणार आहे. BCCI ने नवीन हंगाम आणखी रोचक करण्यासाठी निर्णय पुनरावलोकन प्रणाली (DRS) ची संख्या वाढवली आहे. यासोबतच कोविड-19 संसर्गामुळे सामना न झाल्यास निकाल कसा लागेल याचीही माहिती देण्यात आली आहे. (IPL 2022: ‘या’ 3 आयपीएल संघांच्या ताफ्यात सर्वात खतरनाक गोलंदाज, जे त्यांच्यासाठी बनतील विजेतेपदाची गुरुकिल्ली)

क्रिकबझच्या अहवालानुसार, BCCI ने लीगच्या 15 व्या हंगामासाठी नवीन नियम जारी केले. यातील सर्वात ठळक म्हणजे एखाद्या संघात कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात. जर संघ प्लेइंग इलेव्हन तयार करू शकला नाही तर तो सामना नंतर पुन्हा शेड्यूल केला जाईल. त्यानंतरही सामना झाला नाही तर हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल. याशिवाय लीगदरम्यान प्रत्येक डावात दोन DRS दिले जातील. हा बदल महत्त्वाचा आहे कारण प्रथम कोरोनामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आणि पुन्हा सामना आयोजित करणे शक्य नसेल तर तो संघ पराभूत मानला गेला असता आणि विरोधी संघाला 2 गुण मिळाले असते.

तसेच IPL 2022 दरम्यान खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास गंभीर निर्बंध लादले जातील. यामध्ये एका सामन्याच्या निलंबनापासून ते सात दिवसांच्या रीक्वॉरंटाइन आणि स्पर्धेतून बहिष्कृत करण्यापर्यंत असू शकते. दुसरीकडे, खेळाडू किंवा सामना अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याने बायो-बबलचे उल्लंघन केल्या अधिक गंभीर कारवाई केली जाईल. जर एखाद्या संघाने जाणूनबुजून एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला संघाच्या बबलमध्ये प्रवेश दिला तर त्याला पहिल्या चुकीसाठी 1 कोटी रुपयांपर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि त्यानंतरच्या चुकांमुळे संघाच्या पॉईंट्समधून एक किंवा दोन गुण कमी होऊ शकतात, असे क्रिकबझच्या अहवालात म्हटले आहे.

याशिवाय, बीसीसीआयने MCC ने अलीकडेच कॅच नियमातील बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कोणताही फलंदाज झेलबाद झाल्यास स्ट्राईक बदली जाणार नाही, म्हणजे फक्त नवीन फलंदाज स्ट्राइकवर येतील. तथापि, जर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झेल असेल तर स्ट्राइक बदलली जाईल. इतकंच नाही तर आता प्लेऑफ आणि फायनलमधील टायब्रेकर बाबतचे नियमही बदलण्यात आले आहेत. जर प्लेऑफ किंवा अंतिम सामन्यात सामना टाय झाल्यास एक सुपर ओव्हरनंतर पुढील सुपर ओव्हर शक्य असल्यास लीग टप्प्यातील दोन्ही संघांच्या स्थानाच्या आधारे विजेता निश्चित केला जाईल. तर साखळी टप्प्यात प्रतिस्पर्ध्या पेक्षा वरचा संघ विजेता मानला जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now