IPL: ठरलं! ब्रेंडन मैकुलम याची कोलकाता नाईट रायडर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
कोलकाता नाइट रायडर्सने न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मैकुलमची आगामी आयपीएलसाठी संघाच्या मुख्य प्रशिकपदी नियुक्ती केली आहे. आयपीएलच्या काही सीजनमध्ये मैकुलम कोलकाता संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने आयपीएलच्या सलामीच्याच सामन्याला नाबाद 158 धावांची खेळी केली होती.
कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मैकुलम (Brendon McCullum) याची आगामी आयपीएल (IPL) हंगामासाठी संघाच्या मुख्य प्रशिकपदी नियुक्ती केली आहे. 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएल कारकीर्दीची सुरूवात करणाऱ्या मैकुलमने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस (Jacques Kallis) याच्याकडून पदभार स्वीकारणार आहे. आयपीएलच्या काही सीजनमध्ये मैकुलम कोलकाता संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने आयपीएलच्या सलामीच्याच सामन्याला नाबाद 158 धावांची खेळी केली होती.
काही दिवसांपूर्वी केकेआरने ट्विटरवर जाहीर केले की ते कॅलिस, त्यांचे मुख्य प्रशिक्षक आणि सायमन कॅटिच हे सहायक प्रशिक्षक यांच्याशी विरक्त होत आहे. तसेच आज त्यांनी मैकुलमच्या नियुक्तीबाबत ट्विट करत माहिती दिली. माजी कर्णधार 2008-2010 आणि त्यानंतर 2012-2013 या कालावधीत केकेआरसोबत जवळून काम केले. 2016 ते 2018 दरम्यान तो त्रिनिदाद नाइट रायडर संघाचा भाग होता. यामध्ये त्यांनी मागोमाग, 2017 आणि 2018 मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगचे (Caribbean premier League) सलग दोन जेतेपद मिळवले. पण, डिसेंबर 2018 मध्ये मात्र, मैकुलमला आयपीएलच्या लिलावात एकही विक्रेता मिळाला नाही.
आयपीएलमध्येही त्याने चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आदी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय, 370 टी-20 सामन्यांत त्याने 9922 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 55 अर्धशतकं आणि 7 शतकं आहेत. कॅनडात सुरू खेळण्यात आलेल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये टोरोंटो नॅशनल्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मैकुलमने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्ती जाहीर केली. मॅकलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने (New Zealand) प्रथमच वनडे विश्वचषकच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)