IPL Auction 2019: 'या' खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; पाहा कधी, कुठे, केव्हा सुरु होणार खेळाडूंचा लिलाव
यात 226 भारतीय आणि 70 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
IPL Auction 2019: इंडियन प्रीमियर लीग 2019 (Indian Premier League 2019) साठी खेळाडूंचा आज (18 डिसेंबर) जयपूर येथे लिलाव होणार आहे. यात 346 खेळाडूंवर बोली लावण्यात येईल. यात 226 भारतीय आणि 70 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यंदा 9 परदेशी खेळाडूंनी आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली आहे. तर भारताचा तेज गोलंदाज जयदेव उनाडकट याची बेस प्राईज सर्वाधिक म्हणजे 1.5 कोटी असणार आहे.
कोण कोणत्या टीम्स सहभागी होतील?
आयपीएल सीजन-12 च्या खेळाडूंच्या बोलीत चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, सनराईजर्स हैद्राबाद, किंग इलेवन पंजाब, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स, बँगलोर, दिल्ली कॅपिटल आणि कोलकता नाईट राईडर्स या 8 फ्रॅन्चायजीवर बोली लावण्यात येईल. आयपीएलचा लिलाव दुपारी 2:30 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत चालेल.
या खेळाडूंवर असेल विशेष लक्ष-
ब्रॅंडन मॅकुलम:
आयपीएल च्या 12 व्या सीजनसाठी न्युझीलँडचा जबरदस्त ओपनर फलंदाज ब्रॅंडन मॅकुलम(Brendon McCullum) वर फ्रॅन्चायजी चांगली बोली लावू शकतात. कारण गेल्या सीजनमध्ये ब्रँडन विराट कोहलीचे नेतृत्व असलेल्या रॉयल चॅलेंचर्स बँगलोरमधून खेळला होता. यापूर्वी मॅकुलम आयपीएलमध्ये कोलकता नाईट राईडर्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात लायन्स, कोची टस्कर्स केरला आणि रॉयल चॅलेंचर्स बँगलोरमधून खेळला आहे.
जयदेव उनाडकट:
भारतीय टीमसाठी खेळलेला फास्ट बॉलर जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) आयपीएलच्या मागच्या सीजनमध्ये सर्वात महागडा खेळाडू होता. राजस्थान रॉयल्सने त्याला 11.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते. या सीजनमध्ये त्याने स्वतःची बेस प्राईज 1.5 कोटी इतकी ठेवली आहे. फ्रॅन्चायजी यंदा या गोलंदाजावर विश्वास ठेवू शकेल.
मॉर्ने मोर्केल:
गेल्या सीजनमध्ये अनसोल्ड राहणारा दक्षिण आफ्रीकेचा फास्ट बॉलर मॉर्ने मोर्केल (Morne Morkel) यंदा आपल्या लिलावाने सर्वांना चकीत करु शकेल. कोणत्याही टीमच्या फलंदाजाला तंबूत परतवण्याची क्षमता याच्यात आहे. कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) मध्ये असताना त्याने केलेला खेळ लक्षात राहणारा आहे.
युवराज सिंग
युवराज सिंगची बेस प्राईज कमी झालेली असली तरी परदेशी खेळाडू उपलब्ध न झाल्याने ही परिस्थिती त्याच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. पहिल्या सीजनमधील वाईट कामगिरीमुळे युवराज सिंगला (Yuvraj Singh) किंग इलेवन पंजाबने संघात स्थान दिले नाही. मात्र आयपीएलमध्ये स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्याने आपली बेस प्राईज घटवली. मात्र परदेशी खेळाडूंची कमी संख्या युवराज सिंगच्या पथ्यावर पडू शकते.