IPL 2022 Mega Auction: लिलावात ‘या’ तडाखेबाज खेळाडूंना कदाचितच मिळणार भाव, 2 कोटींची बेस प्राईस असलेले भारतीय खेळाडूंचा खिसा रिकामा राहणार

यावर्षीच्या मेगा लिलावासाठी तब्बल एक हजारहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. लिलावासाठी एकूण 49 खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. यातील 17 खेळाडू भारतीय आहेत, तर उर्वरित परदेशी आहेत. यातील काही खेळाडूंचे खिसे रिकामे राहतील कारण फ्रँचायझी कदाचित त्यांना भाव देतील.

चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Instagram)

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 च्या लिलावात आता फक्त काही दिवस शिल्लक आहे. यावर्षीच्या मेगा लिलावासाठी तब्बल एक हजारहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. डेविड वॉर्नर, श्रेयस अय्यर, आरोन फिंच यांच्यासारख्या स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. आयपीएल (IPL) 2022 चा मेगा लिलाव 12-13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या काळात सर्व आयपीएल फ्रँचायझींचे लक्ष एक मजबूत संघ तयार कारण्याकडे असेल जे त्यांना भविष्यात चांगले परिणाम देऊ शकतील. लिलावासाठी एकूण 49 खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. यातील 17 खेळाडू भारतीय आहेत, तर उर्वरित परदेशी आहेत. यातील काही खेळाडूंचे खिसे रिकामे राहतील कारण फ्रँचायझी कदाचित त्यांना भाव देतील. (IPL 2022 Auction Players Base Price: ‘या’ भारतीय 17 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी, लिलावात आजमावणार नशीब)

1. सुरेश रैना (Suresh Raina)

‘Mr आयपीएल’ सुरेश रैनाने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे हे नाकारता येणार नाही. आयपीएलच्या इतिहासात तो सीएसकेचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तथापि, स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी त्याला रिटेन न करून फ्रँचायझीने सर्वांनाच धक्का दिला. अलीकडच्या काळात त्याचा फॉर्म खालावल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या 2021 च्या आवृत्तीत त्याला चांगलाच संघर्ष करावा लागला. रैनाने यापूर्वी आयपीएलमध्ये काही उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. मात्र, त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो लिलावात न विकला जाण्याची शक्यता आहे.

2. उमेश यादव (Umesh Yadav)

उमेश यादव वनडे आणि टी-20 मध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसत नाही. याशिवाय आयपीएलच्या गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये त्याला फारशी संधीही मिळाली नाही. त्याने 2019 च्या मोसमात आरसीबीकडून पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समधेही अनेक धावा दिल्या. 2020 मध्येही परिस्थिती फारशी चांगली ठरली नाही आणि उमेश यादवला 2021 च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने ताफ्यात सामील केले. मात्र, तो एकही सामना खेळला नाही. आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णासह इतर युवा भारतीय गोलंदाजांना पाहता मेगा लिलावात उमेशसाठी कोणताही संघ बोली लावण्याची शक्यता फारच कमी आहे असे चित्र यंदा दिसु शकते.

3. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

अनुभवी क्रिकेटपटू सध्या आपल्या सर्वोत्तम लयीत नाही आणि त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या लिलावात त्याला फटका बसू शकतो. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील त्याची कामगिरी सर्वोत्तम नव्हती आणि त्यामुळे त्याच्यासाठी लिलावापूर्वी संभ्रमाची स्थिती बनली आहे. भुवीने यावेळी लिलावासाठी आपली मूळ किंमत दोन कोटी ठेवली असून त्याचा खिसा रिकामा राहण्याची शक्यता आहे.

4. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्या सर्वाधिक विकेट घेणारा चहल देखील सध्या बॉलने संघर्ष करत आहे. गेल्या वर्षी श्रीलंका दौरा असो किंवा नुकताच संपुष्टात आलेला दक्षिण आफ्रिकी दौरा चहल बॉलने प्रभावी खेळी करून संघात आपली निवड योग्य सिद्ध करण्यास अपयशी ठरला. याशिवाय गेली वर्षी तो आयपीएलमधेही काही खास कमाल करू शकला नाही. परिणामी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे चहलवर या वेळी लिलावात फ्रँचायझी बोली लावण्याचा जोखीम घेतील असे कमी आहे.



संबंधित बातम्या