IPL 2021: SRH विरोधात 4 रन करूनही KL Rahul ने चक्काचूर केला Virat Kohli याचा मोठा रेकॉर्ड, टी-20 मध्ये खास कमाल करणारा नंबर-1 भारतीय
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल आपला नियमित खेळ करू शकला नसला तरी त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमला गवसणी घातली आहे. अवघ्या 4 धावा करूनही राहुलने विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या पाच हजार धावांच्या क्लबमध्ये प्रवेश करत दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराटचा रेकॉर्ड चक्काचूर केला.
IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आपला नियमित खेळ करू शकला नसला तरी त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमला गवसणी घातली आहे. मर्यादित षटकांच्या स्वरूपातील सर्वात अष्टपैलू फलंदाजांपैकी एक, पंजाब किंग्जचा कर्णधार राहुल, ज्याने राजस्थान रॉयल्स (आरआर) विरोधात उत्कृष्ट अर्धशतक ठोकले होते तो यंदा धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला. तथापि, टी-20 इतिहासात राहुल आपले नाव नोंदविण्यात यशस्वी झाला. अवघ्या 4 धावा करूनही राहुलने विराट कोहली (Virat Kohli) आणि सुरेश रैना यांच्या पाच हजार धावांच्या क्लबमध्ये प्रवेश करत दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले. राहुलने यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराटचा रेकॉर्ड चक्काचूर केला. (PBKS vs SRH IPL 2021: चेपॉकवर सनरायझर्सच्या पराभवाची मालिका खंडित, पंजाबवर 9 विकेटने मात करत नोंदवला पहिला विजय)
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राहुल टी-20 क्रिकेटमध्ये 5,000 धावा करणारा वेगवान फलंदाज ठरला आहे. एलिट यादीमध्ये आपले नाव नोंदवण्यासाठी राहुलला आजच्या आयपीएलचा 14व्या सामन्यात एकच धाव करण्याची गरज होती. सर्वात छोट्या स्वरूपात राहुल 5000 धावा करणारा वेगवान भारतीय फलंदाज आहे तर महान ओपनर आणि वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार क्रिस गेल जगात सर्वात वेगवान फलंदाज आहे. पंजाब किंग्सच्या सहकाऱ्याने आपल्या 132व्या डावात ही कमाल केली होती तर राहुलने 143 डावांमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. राहुलने आता 156 सामन्यात 5003 धावा केल्या असून त्याने जवळपास 42 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. शिवाय, त्याच्या नावावर 41 अर्धशतके देखील आहेत. दरम्यान टी-20 क्रिकेटमध्ये हा टप्प्या पार करण्रात तो 12वा भारतीय खेळाडू आहे. राहुलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 44.57 च्या सरासरीने 2808 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने दोन शतके आणि 23 अर्धशतके देखील झळकावली आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे तर राहुल 6 चेंडूत 4 धाव करून ज्येष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने तंबूत पाठवले. याशिवाय, संघासाठी मयंक अग्रवालने 25 चेंडूत 22 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, शाहरुख खानने 17 चेंडूत 22 धावा केल्या ज्यामुळे पंजाबने चेपॉकवर हैदराबादला 120 धावांचं माफक टार्गेट दिलं. प्रत्युत्तरात सनरायझर्सने 9 विकेट गमावून मोसमातील पहिला विजय मिळवला. जॉनी बेयरस्टोर विजयाचा हिरो ठरला.
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2021 10:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

