India Women vs New Zealand Women, 2nd ODI Match 1st Inning Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला दिले 260 धावांचे लक्ष्य, सोफी डेव्हाईन आणि सुझी बेट्सची अर्धशतकी खेळी; पहा पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड

न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी अवघ्या 93 चेंडूत 87 धावा केल्या.

India Women vs New Zealand Women, 2nd ODI Match 1st Inning Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला दिले 260 धावांचे लक्ष्य, सोफी डेव्हाईन आणि सुझी बेट्सची अर्धशतकी खेळी; पहा पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड
सोफी डिवाइन (Photo Credits: Instagram)

Indian Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team, 2nd ODI Match Scorecard:  भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज 27 ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या मालिकेत (ODI Series) टीम इंडियाची (Team India) कमान हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खांद्यावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचे (New Zealand) नेतृत्व सोफी डिव्हाईन (Sophie Devine) करत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  (हेही वाचा  -  IND W vs NZ W: राधा यादवने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात घेतला सुपर कॅच, Video पाहून तुम्ही ही कराल कौतुक )

या मालिकेत टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे.

पाहा पोस्ट -

तत्पूर्वी, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी अवघ्या 93 चेंडूत 87 धावा केल्या.

. न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिव्हाईनने सर्वाधिक 79 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान सोफी डिव्हाईनने 86 चेंडूत सात चौकार आणि एक षटकार ठोकला. सोफी डिव्हाईनशिवाय सुझी बेट्सने 58 धावा केल्या.

जॉर्जिया प्लिमरच्या रूपाने दीप्ती शर्माने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून राधा यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. राधा यादवशिवाय दीप्ती शर्माने दोन बळी घेतले. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 260 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका काबीज करायची आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2024 06:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).