India vs Pakistan Champions Trophy: भारत-पाकिस्तान सामन्याचे ठिकाण ठरले, जाणून घ्या कुठे होणार ही हायव्होलटेज लढत

पण यातील सर्वात लोकप्रिय स्टेडियम दुबईचे आहे. येथे अनेक सामने झाले आहेत. दुबईबरोबरच अबुधाबी आणि शारजाहचाही पर्याय आहे.

(Photo Credits-Twitter)

India vs Pakistan Champions Trophy:  चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या हायब्रीड मॉडेलसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला याबाबत माहिती दिली आहे. पीसीबीने टीम इंडियाच्या सामन्यांसाठी यूएईची निवड केली आहे. त्याला श्रीलंका आणि यूएईचा पर्याय होता. हे दोन्ही देश पाकिस्तानच्या जवळ आहेत. पण एका रिपोर्टनुसार यूएईच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. (हेही वाचा  - Ravindra Jadeja Press Conference: हिंदी-इंग्रजीच्या मुद्द्यावरून वाद सुरुच, रविंद्र जाडेजावर ऑस्ट्रेलियन मिडीयाचा गंभीर आरोप)

क्रिकबझच्या एका बातमीनुसार, पीसीबीने यूएईमध्ये स्वारस्य दाखवले आहे. याबाबत त्यांनी आयसीसीला अधिकृत माहिती दिली आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी अमिराती क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शेख मुबारक अल नाहयान यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर यूएईच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, आयसीसीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारीला खेळवला जाऊ शकतो. हा सामना दुबईत होऊ शकतो. दुबईचे स्टेडियम इतर स्टेडियमपेक्षा खूप मोठे आहे. त्यामुळे या मैदानावर सामना होण्याची शक्यता अधिक आहे.

दुबईसोबत युएईकडे आणखी दोन पर्याय आहेत -

UAE मध्ये एकूण तीन स्टेडियम आहेत. पण यातील सर्वात लोकप्रिय स्टेडियम दुबईचे आहे. येथे अनेक सामने झाले आहेत. दुबईबरोबरच अबुधाबी आणि शारजाहचाही पर्याय आहे. पण दुबईचे स्टेडियम आकाराच्या बाबतीत या दोघांपेक्षा मोठे आहे. त्यामुळे दुबईचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. ईसीबी आणि पीसीबीच्या बैठकीनंतर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत चर्चा वाढणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक कधी जाहीर होणार -

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळू शकते. हा सामना 20 फेब्रुवारीला होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif