India Beat Bangladesh 1st Test Match Scorecard: चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी केला पराभव, अश्विनने शतकासह उघडला 'पंजा'

IND vs BAN: पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला आहे. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515 धावांचे दिले होते

India Beat Bangladesh 1st Test Match Scorecard: चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी केला पराभव, अश्विनने शतकासह उघडला 'पंजा'
Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला आहे. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515 धावांचे दिले होते. तर दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 62.1 षटकात 10 विकेट गमावून 234 धावा करु शकला. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने 82 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर भारताकडून आर अश्विनने 'पंजा' उघडला.

रविचंद्रन अश्विनची 113 धावांची दमदार खेळी

त्याआधी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी साठी आलेला भारताचा पहिला डाव 376 धावांवर संपुष्टात आला. भारतासाठी रविचंद्रन अश्विनने 113 धावांची दमदार खेळी केली, रवींद्र जडेजाने 86 धावा आणि यशस्वी जैस्वालने 56 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमूदने सलामी दिली तर तस्किन अहमदनं 3 बळी घेतले. (हे देखील वाचा: Most Wickets in WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन पोहोचला टॉप-2 वर, 'हा' गोलंदाज नंबर-1 वर)

बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर गारद

याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ 149 धावा करू शकला. आणि भारताने आघाडी घेतली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, सिराज-जडेजा आणि आकाश दीपने 2-2 विकेट घेतल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 32 धावा केल्या.

पंत-गिलचे दमदार शतक

दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारताने दुसरा डाव चार विकेट गमावून 287 धावांवर घोषित केला आहे. यासह भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515  धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून शुभमन गिलने 176 चेंडूंत 10 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 119 धावा केल्या. तर, केएल राहुल 22 धावा करून नाबाद राहिला. ऋषभ पंतने 109 धावांची खेळी केली.

बांगलादेशला मिळाले विजयसाठी 515  धावांचे लक्ष्य 

दुसऱ्या डावात 515 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला बांगलादेशचा संघ 62.1 षटकात 234 धावा करु शकला. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने 82 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर भारताकडून रविचंद्रन अश्विनने कहर केला आणि सहा विकेट घेतल्या.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).