ICC T20 क्रमवारीत भारताच्या हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्माची मोठी झेप
यानंतर ती 28 व्या स्थानावरून 24 व्या स्थानावर पोहोचली आहे. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने पाकिस्तानविरुद्ध 14 धावांत दोन विकेट घेतल्या.
भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत असून यंदाचा आशिया कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दरम्यान नवीन ICC T20 Rankings जाहीर झाली आहे. याचा फायदा भारतीय खेळाडूंना होताना दिसत आहे. विशेषत: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा यांनी मोठी झेप घेतली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि ऋचा घोष यांनी ICC T20 क्रमवारीत झेप घेतली आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया कप 2024 मुळे टी-20 क्रमवारीत मोठे बदल दिसून आले आहेत. (हेही वाचा - खेळाडूंना षटकार मारण्यावर बंदी, सिक्स मारल्यास फलंदाज होणार बाद, इंग्लंडच्या क्रिकेट क्लबचा अजब निर्णय)
आशिया चषकात भारताने आतापर्यंत पाकिस्तान यूएई आणि नेपाळवर मोठे विजय नोंदवले आहेत. कर्णधार हरमनप्रीत आणि सलामीवीर शेफाली टी-20 फलंदाजी क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचले आहेत. दोघीही आता संयुक्तपणे 11 व्या क्रमांकावर आहेत. शेफाली वर्माने पाकिस्तानविरुद्धच्या 40 धावांच्या खेळीनंतर चार स्थानांनी झेप घेतली आहे. यूएईविरुद्धच्या 66 धावांच्या खेळीचा फायदा हरमनप्रीत कौरला झाला आहे.
रिचा घोषने UAE विरुद्ध 29 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर ती 28 व्या स्थानावरून 24 व्या स्थानावर पोहोचली आहे. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने पाकिस्तानविरुद्ध 14 धावांत दोन विकेट घेतल्या. यानंतर ती 10 व्या स्थानावरून नवव्या स्थानावर आली आहे, म्हणजेच तिने एका स्थानाची झेप घेतली आहे. दीप्ती शर्माने टी-20 मधील अष्टपैलू आणि गोलंदाजी क्रमवारीत तिसरे स्थान कायम राखले आहे, तर स्मृती मानधनाही पाकिस्तानविरुद्ध शानदार 45 धावा करून पाचव्या स्थानावर कायम आहे.