Emotional Moments of Cricket: क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक भावनिक क्षण, पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू
प्रत्येक खेळतील खेळाडूंमध्ये भावना असतातच आणि क्रिकेटही याला अपवाद नाही. मागील अनेक वर्षात आपण क्रिकेटच्या मैदानावर असे अनेक भावनिक क्षण पहिले आहेत ज्यांनी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला आहे. आज आपण अशा पाच भावनिक क्षणांवर नजर टाकूया जे आजही चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणतात:
Emotional Moments of Cricket: प्रत्येक खेळतील खेळाडूंमध्ये भावना असतातच आणि क्रिकेटही (Cricket) याला अपवाद नाही. व्यावसायिक खेळांमधील स्पर्धात्मकतेची पातळी उंचावर पोहोचली आहे आणि जेव्हा दोन बाजू सर्वोत्तम कामगिरी करतात तेव्हा एका संघाला दुसर्या क्रमांकावर राहावे लागते. हे हाताळणे, केवळ सहभागी खेळाडूंसाठीच नाही, तर चाहत्यांसाठी देखीलनक्कीच कठीण असते. भारतात क्रिकेट (Cricket in India) एक धर्म आहे. इथे अनेक हिरो आहेत. जेव्हा हे खेळाडू रडतात तेव्हा ते एकटेच रडत नाहीत- संपूर्ण क्रिकेटजगाचाही डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात. क्रिकेट हा एक सुंदर खेळ आहे ज्यात भावना आहेत, नाट्यमय विजय आहे, आक्रमकता आहे, मोठा चाहता वर्ग आणि फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. (Virender Sehwag याचे शतक होऊ नये यासाठी 'या' क्रिकेटरने आपले करिअरच लावले पणाला, जाणून घ्या कोण होता 'तो')
जेव्हा एखादा खेळ इतक्या आक्रमकतेने खेळला जातो तेव्हा भावना सर्वात वर असतात. मागील अनेक वर्षात आपण क्रिकेटच्या मैदानावर असे अनेक भावनिक क्षण पहिले आहेत ज्यांनी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला आहे. आज आपण अशा पाच भावनिक क्षणांवर नजर टाकूया जे आजही चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणतात:
1. सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त
'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणाऱ्या मास्टर-ब्लास्टरने दोन दशकाहून अधिक काळ त्याच्या शानदार फलंदाजीने जागतिक क्रिकेटवर राज्य केले. 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम कसोटी सामना खेळत सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं. त्या दिवशी फक्त सचिननच नव्हे तर स्टेडियममध्ये उपस्थित आणि टीव्हीवर पाहणारा प्रत्येक चाहत्याच्या डोळ्यात अश्रू उतरले.
2. 2015 वर्ल्ड कपमधून दक्षिण आफ्रिकेची एक्सिट
2015 विश्वचषकात पावसामुळे सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडसमोर लक्ष्य कमी करण्यात आले आणि दक्षिण आफ्रिकेच्या पराभवात पावसाने मुख्य भूमिका बजावली. ग्रँट इलियटचा कॅच सोडले आफ्रिका संघाला महागात पडले. सामन्याच्या पेनल्टीमेट चेंडूवर ग्रॅन्ट इलियटने षटकार मारत दक्षिण आफ्रिका संघाचा वर्ड कपमधील प्रवास संपुष्टात आणला. त्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडूंचे डोळे अश्रूंनी भरुन गेले. शिवाय, इलियट देखील अंतिम ओव्हर टाकलेल्या डेल स्टेनचे सांत्वन करताना दिसला.
3. इंझमाम-उल हकचा अंतिम सामना
पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल हक आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या अंतिम सामन्यात भावुक झाले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळणे त्यांनी चाहत्यांच्या मनात स्वतःसाठी खास स्थान मिळवले. इंझमामबद्दल प्रेम आणि आदर त्याच्या निरोप सामन्यात स्पष्टपणे दिसला. इंझमाम यांनी 2007 वर्ल्ड कपदरम्यान झिम्बाब्वेविरुद्ध अंतिम सामना खेळला तो बाद झाल्यानंतर मैदानावरील झिम्बाब्वेच्या सर्व खेळाडूंनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व पाकिस्तानी खेळाडूंनीही इंझमामला गार्ड ऑफ ऑनर दिला ज्यामुळे इंझी देखील थोडे भावुक झाले. हा एक असा क्षण होता जे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या नेहमीच स्मरणात राहील.
4. 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलमधील पराभव
जर आपण महेंद्र सिंह धोनीचे फॅन आहात तर आपणास नक्कीच तो दिवस आठवत असेल. धोनीचा अंतिम वर्ल्ड कप म्हणून खेळाडूचं नव्हे तर चाहते देखील उत्सुक होते. धोनी न्यूझीलंडविरुद्ध अंतिम आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. या सामन्यात भारताला अगदी काही धावांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, धोनी धावबाद होताच खेळाडूं, स्टेडियम, टीव्ही आणि स्मार्टफोनवर सामना पाहणारा प्रत्येक चाहत्याला इतकंच नाही तर स्वतः धोनीला देखील अश्रू अनावर झाले.
5. इंग्लंड-न्यूझीलंड वर्ल्ड कप फायनलइंग्लंड आणि न्यूझीलंडमधील वर्ल्ड कप फायनल सामना अत्यंत नाट्यमय होता. सामना बरोबरीत सुटल्यावर सुपर-ओव्हर देखील टाय झाली त्यानंतर सर्वाधिक चौकारांच्या आधारावर इंग्लंडने मनोरंजक विजय मिळवला. रोमांचित सामन्यात पराभवानंतर संपूर्ण न्यूझीलंड संघ भावुक आणि निराश झालेला दिसला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)