Asia Cup 2023: आशिया चषकासाठी भारतीय खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ठोकणार तळ, 'हे' खेळाडू करणार पुनरागमन
आशिया चषकासाठी भारतीय खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे तळ ठोकणार आहेत. ज्यामध्ये दुखापतीतून सावरलेले अनेक खेळाडूही सहभागी होणार आहेत.
Team India Camp Nca: आशिया कपसाठी (Asia Cup 2023) टीम इंडियाची (Team India) लवकरच घोषणा होणार आहे. त्याआधी आशिया चषकासाठी भारतीय खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे तळ ठोकणार आहेत. ज्यामध्ये दुखापतीतून सावरलेले अनेक खेळाडूही सहभागी होणार आहेत. यावेळी आशिया कप पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंकामध्ये (Sri Lanka) आयोजित केला जात आहे, ज्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. (हे देखील वाचा: स्टार स्पोर्ट्सने Asia Cup 2023 चा प्रोमो केला जारी, संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसला India vs Pakistan सामन्याचा रंग (Watch Video)
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होणार शिबीर
आशिया कप 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, हे शिबिर 24 ते 29 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत चालणार आहे. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, केएल राहुल, श्रेयस अय्यर या खेळाडूंचा समावेश असेल. हे सर्व खेळाडू दुखापतीतून सावरत आहेत. या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जर संजू सॅमसन आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये सामील झाला तर त्याला एनसीएमध्ये येण्याच्या सूचनाही मिळू शकतात.
India will host the 2023 NCA camp on the occasion of Asia cup tournament form August 24 to August 29 announced by cricbuzz. pic.twitter.com/cWedhhRe9W
— Ramdev Royals (@PragadaRamdev) August 4, 2023
'हे' खेळाडू आशिया कपमध्ये करू शकतात पुनरागमन
टीम इंडियाच्या सर्व वरिष्ठ खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र आशिया कपमध्ये सर्व खेळाडू पुनरागमन करतील, तर दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंनाही संघात संधी दिली जाईल. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, केएल राहुल, श्रेयस अय्यर संघात पुनरागमन करू शकतात. बुमराहला आयर्लंड दौऱ्यासाठी संघाचा कर्णधार बनवण्यात आल्याने आशिया चषक स्पर्धेतील बुमराहचे स्थान निश्चित मानले जात आहे. पण अय्यर आणि राहुल यांच्याबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
भारत सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे
आशिया कपचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे केले आहे. पण 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारत आपले सर्व सामने फक्त श्रीलंकेत खेळणार आहे. भारत 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2023 06:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

