'जर आरसीबी जिंकली तर...'; बंगळुरूच्या चाहत्यांची CM Siddaramaiah यांच्याकडे पत्राद्वारे मोठी मागणी
रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली आरसीबी आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.पहिल्यांदाच आरसीबीला विजेता बनण्याची संधी आहे. आरसीबीचा सामना 3 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. बंगळुरूच्या समर्थकाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे खास मागणी केली आहे.
रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली आरसीबी आयपीएल 2025 (IPL 2025) च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. संघाला पहिल्यांदाच आयपीएल विजेता बनण्याची उत्तम संधी आहे. आरसीबीला 3 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळायचा आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) एका समर्थकाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्याकडे एक अनोखी मागणी केली आहे. या चाहत्याची मागणी आहे की जर संघाने यावर्षी इंडियन प्रीमियर लीग जिंकला तर त्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर करावी.
बेळगाव जिल्ह्यातील शिवानंद मल्लनवार नावाच्या या चाहत्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, आरसीबी आयपीएल जिंकली तर त्या दिवशी अधिकृतपणे आरसीबी फॅन्स फेस्टिव्हल म्हणून घोषित करावा. जो कर्नाटक राज्योत्सवासारखा असेल. मल्लनवर यांनी कर्नाटक सरकारला दरवर्षी ही तारीख सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्याची विनंती केली जेणेकरून राज्यातील चाहते दरवर्षी हा महत्त्वाचा प्रसंग साजरा करू शकतील. त्यांनी राज्यव्यापी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आणि जर आरसीबीने चॅम्पियनशिप जिंकली तर कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये उत्सव साजरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करावी अशी मागणी केली.
क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून आरसीबीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आरसीबी 9 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. आत्तापर्यंत आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही संघाची चौथी वेळ आहे. गेल्या 18 वर्षाच्या आयपीएलच्या इतिहासात संघाने अकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. आरसीबी चाहत्याने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2025 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

