BBL 2020-21 Full Schedule: बिग बॅश लीग 10 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; पर्थ, मेलबर्न येथेही खेळवले जाणार सामने

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया येथे देखील बीबीएलच्या येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या सामन्यांचे आयोजन केले जाणार असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी जाहीर केले. पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर पाच सामने खेळले जातील, त्यातील पहिला सामना 3 जानेवारी रोजी खेळला जाईल.

बिग बॅश लीग (Photo Credit: Facebook)

BBL 2020-21 Full Schedule: क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून (Cricket Australia) अखेर बिग बॅश लीगच्या (Big Bash League) 10व्या सत्राचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मंडळाने डिसेंबर महिन्यात 21 बीबीएल सामन्यांचे वेळापत्रक (BBL Schedule) जाहीर केले होते ज्यानुसार होबर्ट आणि कॅनबेरा येथील बायो-बबल सुरुवातीच्या खेळांचे आयोजन करणार असल्याची पुष्टी केली होती. 10 डिसेंबर रोजी बीबीएलचा (BBL) पहिला सामना खेळला जाईल त्यानंतर क्वीन्सलँड (23 डिसेंबर) आणि अ‍ॅडिलेड (28 डिसेंबर) येथे देखील सामने आयोजित केले जातील. आणि आता वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया येथे देखील बिग बॅश लीगच्या (बीबीएल) येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या सामन्यांचे आयोजन केले जाणार असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी जाहीर केले. पर्थ (Perth) येथील ऑप्टस स्टेडियमवर पाच सामने खेळले जातील, त्यातील पहिला सामना 3 जानेवारी रोजी खेळला जाईल. यातील चार सामने पर्थ स्कॉर्चर्स, होम टीमचे होतील. त्यानंतर, 13 जानेवारीपासून बीबीएल सिडनी आणि मेलबर्न येथे प्रवास करेल. (BBL 2020-21 Schedule: बिग बॅश लीग सीझन 10 ची 'या' दिवसापासून होबार्ट आणि कॅनबेरा बबलमध्ये होणार सुरुवात, पाहा वेळापत्रक)

सिडनी येथे आठ सामने खेळविण्यात येणार असून सिडनी क्रिकेट मैदान आणि सिडनी शोग्राऊंड स्टेडियम प्रत्येकी चार सामने आयोजित केले जाईल. मेलबर्न एकूण 11 सामने आयोजित केले जातील. यातील पाच सामने मार्वेल स्टेडियमवर तर सहा मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला अ‍ॅडिलेड ओव्हल (तीन), गाब्बा (दोन), मेट्रिकॉन स्टेडियम (चार) आणि ब्लंडस्टोन अरेना (दोन) येथे अतिरिक्त सामन्यांची पुष्टीही करण्यात आली आहे. लीगचा अंतिम साखळी सामना 26 जानेवारी रोजी खेळला जाईल आणि एससीजी (एक सामना) आणि एमसीजी (दोन सामने) दरम्यान ट्रिपल-हेडर आयोजित केले जाईल. 29 जानेवारीपासून प्ले-ऑफ तर 6 फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल.

दरम्यान, राज्यातील कोविडच्या वाढत्या संख्येमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड ओव्हल येथे डिसेंबर महिन्यात आयोजित होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री रोखली आहे. "लीग दक्षिण ऑस्ट्रेलियामधील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे आणि बीबीएल 10 हंगामातील त्याचा परिणाम समजण्यासाठी सरकारांशी काम करीत आहे," क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले. बीबीएल 10 ची सुरुवात 10 डिसेंबर रोजी ब्लंडस्टोन एरिना येथे होबार्ट हरिकेन आणि गतविजेत्या सिडनी सिक्सर्स यांच्यातील मोसमाच्या सलामीच्या सामन्यापासून होईल.