Babar Azam New Milestone In T20I: विराट कोहलीला मागे टाकत बाबर आझमने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला अनोखा विक्रम
या खेळीदरम्यान बाबर आझमने अवघ्या 28 चेंडूत चार चौकार मारले. दरम्यान, त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे.
Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 3rd T20I Match 2024 Scorecard: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series) तिसरा सामना आज म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना होबार्टमधील (Hobart) बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियमवर (Bellerive Oval Stadium) खेळला गेला. तिसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) पाकिस्तान (Pakistan) संघाचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह आहे. या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जोश इंग्लिसच्या (Josh Inglis) खांद्यावर होती. तर पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे (Mohammad Rizwan) होते. (हेही वाचा - Border Gavaskar Trophy New Milestone: 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, मालिकेत होऊ शकतात हे मोठे विक्रम)
तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 17 धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला मोठा धक्का बसला. तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 18.1 षटकात केवळ 117 धावांवरच गारद झाला.
पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान बाबर आझमने अवघ्या 28 चेंडूत चार चौकार मारले. दरम्यान, त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे. आता बाबर आझम आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे.
रोहित शर्माच्या मागे बाबर आझम
पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमच्या नावावर आता 119 डावांमध्ये 40.30 च्या सरासरीने आणि 129.22 च्या स्ट्राईक रेटने 4,192 धावा आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीने 125 सामन्यांच्या 117 डावांमध्ये 48.69 च्या सरासरीने आणि 137.04 च्या स्ट्राइक रेटने 4,188 धावा केल्या होत्या. या बाबतीत बाबर आझमच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने 159 सामन्यांच्या 151 डावांमध्ये 4,231 धावा केल्या होत्या.
बाबर आझमची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द
बाबर आझमने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. बाबर आझमने आतापर्यंत 126 सामने खेळले आहेत. या काळात बाबर आझमने 15 वेळा नाबाद राहताना 4,145 धावा केल्या आहेत. बाबर आझमने 3 शतके आणि 36 अर्धशतके केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विक्रमही बाबर आझमच्या नावावर आहे. बाबर आझमने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3,244 चेंडू खेळले आहेत.
बाबर आझमने टी-20 क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत डू प्लेसिसला मागे टाकले आहे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात बाबर आझम टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ पोहोचला आहे. बाबर आझमने 307 टी-20 सामन्यांमध्ये 43.60 च्या सरासरीने 10,989 धावा केल्या आहेत. दरम्यान, बाबर आझमने 11 शतके आणि 90 अर्धशतकांसह सर्वाधिक 122 धावा केल्या आहेत. बाबर आझमने आज धावांच्या बाबतीत फाफ डुप्लेसिस (10,950) आणि कॉलिन मुनरो (10,961) यांना मागे टाकले आहे.