Abu Dhabi T10 League 2021: अबू धाबी येथे 'हे' तीन भारतीय खेळाडू टी-10 लीग, वाचा सविस्तर
28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान या टी-10 लीगचे आयोजन केले जाईल.
Abu Dhabi T10 League 2021: अनुभवी लेगस्पिनर प्रवीण तांबे (Pravin Tambe), उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज ईशान मल्होत्रा (Ishan Malhotra) आणि लेगस्पिनर प्रशांत गुप्ता (Prashant Gupta) हे तीन भारतीय खेळाडू पुढील वर्षी होणार्या अबू धाबी टी-10 लीगच्या (Abu Dhabi T10 League) चौथ्या आवृत्तीत खेळताना दिसणार आहेत. 28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान या टी-10 लीगचे आयोजन केले जाईल. ऑगस्ट महिन्यात आयोजित केलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (Caribbean Premier League) खेळणारा तांबे पहिला भारतीय खेळाडू होता, जिथे तो ट्रिनबॅगो नाइट रायडर्स (Trinbago Knight Riders) संघाकडून खेळला. 49 वर्षीय तांबेने 2013 मध्ये वयाच्या 41व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलमध्ये आजवर खेळलेल्या 33 सामन्यात त्याने 28 विकेट घेतल्या आहेत. मागील वर्षी खेळलेल्या तिसर्या आवृत्तीत भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंहने लीगमध्ये अरेबियन (Arabian) संघाकडून पदार्पण केले, तर भारताचा माजी वेगवान वेगवान गोलंदाज झहीर खान दिल्ली बुल्सकडून खेळला.
अरेबियन संघाकडून खेळणाऱ्या फिरकीपटू ईशानने 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध एक सामना खेळला होता. डेक्कन ग्लॅडिएटर्सने खरेदी केलेल्या गुप्ताने 2008 ते 2019 पर्यंत उत्तर प्रदेश आणि रेल्वेकडून घरगुती क्रिकेट खेळले. दरम्यान, मागील सत्रात युवराज आणि झहीरला वगळता एस बद्रिनाथ आणि मुनाफ पटेल देखील टी-10 लीगमध्ये झळकले होते. “ड्राफ्टमधील खेळाडूंची जास्त संख्या टी-10 लीगची लोकप्रियता दर्शवते. सर्व फ्रॅन्चायझी संतुलित आहेत आणि त्यांनी खेळाडूंना निवडताना खूप विचार केला आहे. अबू धाबी टी 10 येथे क्रिकेटच्या आणखी एका मजेदार हंगामासाठी अव्वल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टार्स एकत्र येत पाहणे खरोखर विलक्षण आहे. मी सर्व संघ आणि खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो," अबू धाबी टी-10 चे संस्थापक आणि अध्यक्ष शाजी उल मुल्क म्हणाले.
अबू धाबी क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट बाउचर म्हणाले, "या मोसमात आम्हाला एक अविश्वसनीय आयकॉन खेळाडूंचा लाईन-अप मिळाला आहे आणि त्याशिवाय संघांनी जबरदस्त टीमच्या निवड करण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. सर्व संघ सज्ज आणि तयार आल्यामुळे उत्साह खरोखरच वाढत आहे."