Tokyo Olympics 2020: पहिल्या पराभवानंतर मनू भाकरची पुन्हा पदकाच्या दिशेने वाटचाल

भारतीय नेमबाज (Indian shooter) मनु भाकरने (Manu Bhakar) 25 मीटर एअर पिस्तूल (25 meter air pistol) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पात्रता फेरीत मनु भाकरला 5 वा क्रमांक मिळाला आहे.

मनु भाकर | File Image | (Photo Credits: PTI)

टोकियो ऑलिम्पिकचा (Tokyo Olympics) सातवा दिवस भारतासाठी (India) उत्कृष्ट ठरला आहे. भारतीय नेमबाज (Indian shooter) मनु भाकरने (Manu Bhakar) 25 मीटर एअर पिस्तूल (25 meter air pistol) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पात्रता फेरीत मनु भाकरला 5 वा क्रमांक मिळाला आहे. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय नेमबाज राही सरनोबत (Rahi Sarnobat) 25 व्या स्थानावर आहे.  मनूने 30 निशाण्यांनंतर 292 गुण मिळवले आहेत. आसाका नेमबाजी रेंजमध्ये 44 स्पर्धकांपैकी पात्रता ठरली आहे. तर तिची सहकारी राही केवळ 277 धावा करू शकली. शुक्रवारी पात्रता वेगवान फेरीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. पात्रतेमध्ये अव्वल आठमध्ये स्थान मिळवणारे नेमबाज अंतिम फेरीत प्रवेश करतील. सर्बियाची झोराना अरुणोविच 296 गुणांसह आघाडीवर आहे. तर ग्रीसची आना कोराकाकी 294 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

एकोणीस वर्षीय भारतीय नेमबाज मनुने पहिल्या दोन मालिकांत 97 गुणांसह सुरुवात केली आहे. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले. दहा वेळा नऊ गुणांसह दोनदा आठ धावा केल्या आहेत. दुसर्‍या मालिकेतही मनुने पुनरागमन केले आहे. शेवटच्या पाच निशांण्यावर 10 गुण मिळवले आहेत. ओसीयेक विश्वचषकातील सुवर्णपदक विजेती राहीने पहिल्या सामन्यात 96 गुण मिळवले. त्यानंतर 97 गुणांसह प्रीसेझन फेरीची सुरुवात केली. अंतिम मालिकेत तिला आठ आणि नंतर नऊ गुणांसह 94 गुण मिळू शकले आहेत. त्यामुळे बऱ्याच गुणांनी खाली घसरण झाली. पहिल्या 10 नेमबाजांमध्ये 287 गुणांसह ती सातव्या स्थानावर होती.

10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनु भाकरने निराश केले होते. मिश्र दुहेरीतही मनु भाकर अपेक्षेनुसार खेळू शकली नाही. पण आता 25 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनु भाकरला मागील दोन अपयशांपासून पुढे जाण्याची उत्तम संधी आहे. भारताला मनू भाकरकडून जास्त अपेक्षा आहेत. आधीच्या स्पर्धेत तिला लक्षणीय कामगिरी करता आली नाही. तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्याने तिचे खेळावरील नियंत्रण सुटले असे दिसून आले. त्यामुळे तिला या सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. मात्र आता तिला पुन्हा आपली झलक दाखवण्याची संधी मिळाली आहे. आता या संधीचा मनू भाकर पुर्णपणे फायदा घेत पुढील फेरीसाठी पात्र ठरेल असा तिचा प्रयत्न असेल.