Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताच नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, जाणुन घ्या किती रक्कम मिळाली बक्षिसात

हरियाणा सरकारने (Hariyana Government) पानिपतचे (Panipat) रहिवासी नीरज चोप्रा यांना 6 कोटी रुपये आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक (Photo Credit: PTI)

टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) भालाफेक (Javelin throw) स्पर्धेत नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. नीरज चोप्रा अॅथलेटिक्समध्ये (Athletics) भारताकडून ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने ही महान कामगिरी  करताच त्याच्यावर बक्षिसांचा (Prize) वर्षाव सुरू झाला आहे. हरियाणा सरकारने (Hariyana Government) पानिपतचे (Panipat) रहिवासी नीरज चोप्रा यांना 6 कोटी रुपये आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. नीरज चोप्राचे अभिनंदन करताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Haryana Chief Minister Manoharlal Khattar) म्हणाले की नीरज चोप्राने संपूर्ण देश जिंकला आहे. ते म्हणाले नीरज चोप्राने केवळ पदक जिंकले नाही, तर संपूर्ण राष्ट्राचे मन जिंकले. देश बराच काळ या क्षणाची वाट पाहत होता आणि संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे.

हरियाणा सरकारने ऑलिम्पिक खेळ सुरू होण्यापूर्वीच जाहीर केले होते की हरियाणातील कोणताही खेळाडू जो ऑलिम्पिक सुवर्ण जिंकेल त्याला 6 कोटी रुपये दिले जातील. हरियाणा सरकारने नीरज चोप्राला ग्रेड ए ची नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच सरकार नीरज चोप्राला पंचकुलामध्ये फ्लॅट खरेदीवर सवलत देईल.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही नीरजच्या टोकियोमधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले. पंजाब सरकारने नीरज चोप्राला दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले सोने! नीरज चोप्रा. तुम्ही इतिहास घडवला आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही नीरज चोप्राच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. नीरज चोप्राचे कौतुक करताना बीसीसीआयने त्याला एक कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याचे आश्वासन दिले आहे. नीरज चोप्राचे अभिनंदन करताना आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्सने एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. आनंद महेंद्र यांनी सांगितले आहे की, ते भारतात परतल्यावर नीरज चोप्राला एक SUV 700 भेट देतील.

नीरज चोप्राने शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीय खेळांमध्ये नवा इतिहास रचला आहे. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर फेकले, जे सुवर्णपदक मिळवण्यासाठी पुरेसे होते. ऑलिम्पिक अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिले पदक आहे. यासह त्याने अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी भारताची 100 वर्षांहून अधिक प्रतीक्षा संपवली. नीरजला सुवर्ण मिळताच देशभरात जल्लोष सुरू झाला. पानिपत येथील त्यांच्या घरी मोठा जल्लोष झाला. नीरज चोप्राचे वडील म्हणाले की सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे. आमच्या भागात क्रीडा सुविधांचा अभाव आहे. तो आपल्या खेळांसाठी घरापासून 15-16 किलोमीटर दूर जायचा. या सर्वातून बाहेर पडत त्याने आज सुवर्णपदक जिंकलं आहे.