Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा धोका वाढला, नवे 24 जणांना कोरोनाची बाधा

गुरुवारीही येथील क्रीडा गावात कोरोनाचे 24 नवीन रुग्ण आढळले आहेत. यात तीन अ‍ॅथलीट्सचा (Athletes) समावेश आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

टोकियो ऑलिम्पिकवर (Tokyo Olympics) कोरोनाचा (Corona Virus) धोका सतत वाढत आहे. गुरुवारीही येथील क्रीडा गावात कोरोनाचे 24 नवीन रुग्ण आढळले आहेत.  यात तीन अ‍ॅथलीट्सचा (Athletes) समावेश आहे. आजपर्यंत ऑलिम्पिक गेम्समध्ये (Olympic Games) एकाच दिवसात नोंदवल्या गेलेल्या सर्वाधिक घटना आहेत. ऑलिम्पिकच्या आयोजकांनी (Olympic organizers) ही माहिती दिली आहे. यासह ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासूनच येथे सापडलेल्या कोरोना प्रकरणांची (Corona Cases) संख्या 193 वर गेली आहे. यापूर्वी बुधवारी ऑलिम्पिकशी संबंधित कोरोनाची 16 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी एकही बाधित खेळगावमध्ये राहणाऱ्या अ‍ॅथलीट्स किंवा अधिकाऱ्यांशी संबंधित नाही.

काल आढळलेल्या कोरोनातील 24 नवीन प्रकरणांपैकी 15 कर्मचारी या क्रीडा संबंधित संबद्ध कर्मचारी तसेच कंत्राटदार आहेत. तर तीन अ‍ॅथलीट्सचे अहवालही सकारात्मक आले आहेत. आयोजकांच्या मते, सोमवारपर्यंत परदेशातून सुमारे 38 हजार 484 लोक जपानमध्ये आले आहेत.

यापूर्वी काल जपानमध्ये कोरोना संसर्गाची 9583 तर टोकियोमध्ये 3177 प्रकरणे आढळली होती, जी जानेवारीनंतरची सर्वाधिक नोंद आहे. मंगळवारीही येथे कोरोना संसर्गाची 2,848 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या वर्षी साथीच्या रोगाचा प्रारंभ झाल्यापासून, कोविड संसर्गाची एकूण प्रकरणे दोन लाखांपेक्षा जास्त आहेत. या साथीला सामोरे जाण्यासाठी, टोकियोमध्ये चार वेळेस आपत्कालीन स्थिती लागू करण्यात आली आहे. जी पुढच्या महिन्यात ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांपर्यंत सुरू राहणार आहे.

मागील वर्षापासून कोरोनाचा पार्दुभाव संपुर्ण जगावर आहे. कोरोनामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या कोरोनाच्या संकटामुळे जागतिक मंदी आली आहे. कोरोनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात टोकियो ऑलिंपिंकवरही होत आहे. दरम्यान आज टोकियो ऑलिम्पिकच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीने अनेक स्पर्धांमध्ये पदकांच्या आशा वाढवल्या आहेत. हॉकी, बॅडमिंटन आणि तिरंदाजीनंतर आता बॉक्सिंगमध्येही भारतासाठी चांगली बातमी आली आहे. भारतीय खेळाडू आज उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहेत. 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif